Home Breaking News बालिकेवर अत्याचार, ‘लखन’ अटकेत

बालिकेवर अत्याचार, ‘लखन’ अटकेत

मरेगाव येथील घटनेने खळबळ

रोखठोक | घरा समोरून जात असलेल्या अल्पवयीन बालिकेला घरात ओढून बळजबरीने अत्याचार करणाऱ्या 20 वर्षीय ‘लखन’ ला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ही घटना बुधवारी सकाळी 11 वाजताच्या दरम्यान घडली असून मारेगाव पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

लखन रावत (20) असे अटकेतील आरोपींचे नाव आहे. विस्तृत वृत्त असे की, मारेगाव शहरात वास्तव्यास असलेली बालिका सकाळी आपल्या घराकडे जात होती. मार्गावरच त्या नराधमांचे घर होते. आजूबाजूला कोणीच नसल्याचे बघून त्याने क्षणाचा विलंब न करता तिला आपल्या घरात ओढले.

घरात ओढल्यानंतर त्याने तिच्यासोबत अत्याचार केला. या अनपेक्षित प्रकाराने ती बालिका प्रचंड घाबरली व रडायला लागली. दरम्यान पीडित बालिका घरी पोहचली नाही म्हणून तिच्या आई ने तिची शोधाशोध सुरू केली. आरोपीच्या घरा समोर आई चा आवाज ऐकायला येताच बालिकेने आरडाओरड केली.

Img 20250103 Wa0009

पीडितेची आई त्या घरात पोहचताच बालिकेला कवटाळून रडायला लागली. तेव्हा शेजारीपाजारी जमा झाले. आता काही खरं नाही असे समजून लखन पसार झाला. या प्रकरणी पीडितेच्या आई ने पोलीस ठाणे गाठून रीतसर तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत भादवि कलम 376, 376 (3), 506 सहकलम पोक्सो 4 व 6 कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे.
वणी : बातमीदार