● उपचारार्थ चंद्रपूर ला हलवले
रोखठोक | येथील घुग्गुस मार्गावरील एका मदिरालया समोर काही अज्ञातानी नितीन उकनकर यांचेवर अचानक प्राणघातक हल्ला केला. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर ला हलविण्यात आले आहे. ही घटना शनिवार दि. 24 डिसेंबरला सायंकाळी घडली.
नितीन उकनकर (40) असे जखमीचे व्यक्तीचे नाव आहे, तो वणीतील निवासी आहे. घटनेच्या दिवशी तो घुग्गुस मार्गावरील साहिल बार आणि रेस्टॉरंट मध्ये गेला होता. काहीवेळ आपले कार्य पूर्ण करून तो बारच्या बाहेर आला असता अज्ञात युवकासोबत त्याचा वाद झाला.
त्या अज्ञात तरुणाने फोन करून आपल्या सवंगडयाना बोलावले. यावेळी वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि लाकडी दांड्याने नितीनच्या डोक्यावर मारहाण करण्यात आली. आणि लगेचच त्या युवकांनी तेथून पलायन केले, घडलेल्या घटनेमुळे काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
जखमी नितीन ला तात्काळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. डोक्यावर झालेल्या जखमेवर टाके मारण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी चंद्रपूर ला हलविण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी रुग्णालयात जखमीचे बायन घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
वणी : बातमीदार






