● रस्त्यावरील उभे ट्रक घातक
रोखठोक | गौराळा फाटा अपघात प्रवण क्षेत्र बनले आहे. एक दिवसापुर्वी उभ्या ट्रकला धडकणाऱ्या दुचकीस्वारांचा मृत्यू झाला होता. त्याच ठिकाणी पुन्हा गुरुवारी सायंकाळी भीषण अपघात झाला. यात 35 वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला आहे.
गणेश बापुराव गुंजेकार (35) असे जखमी तरुणाचे नाव आहे. तो आपले नित्यनियमाचे काम आटोपून वणी येथून आपल्या दुचाकी क्रमांक (MH-29-BL-7842) ने बुरांडा या गावी जात होते. गौराळा फाट्या जवळ उभा असलेला ट्रक दुचाकीस्वाराला अंधारात दिसलाच नाही. अचानक नियंत्रण बिघडले आणि भीषण धडक बसली.
या घटनेत दुचाकीस्वार हा गंभीर जंखमी झाला. ही घटना कळताच जनहित कल्याण संघटनेचे पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी तरुणाला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी चंद्रपूरला हलविण्यात आले आहे.
वणी: बातमीदार






