● डोके व पायाला मार, उपचार सुरू
रोखठोक | नियोजित कार्यक्रमाला जात असताना बुधवारी सकाळी भरधाव दुचाकी स्वाराने आमदार बच्चू कडू यांना जबर धडक दिली. यात त्यांच्या डोक्याला व उजव्या पायाला मार लागला असून त्यांचेवर अमरावती येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
कार्यक्रमाला जाण्यासाठी आमदार बच्चू कडू वाहनात बसत होते त्याचवेळी रस्त्यावरून जात असलेली भरधाव दुचाकी आ. कडू यांना धडकली. यावेळी ते लगतच्या डिव्हायडर वर पडले. त्यांच्या डोक्याला दुखापत झाली तर उजव्या पायाला मार लागला.
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे एकच कल्लोळ माजला आ. कडू यांना तात्काळ एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्या डोक्याला चार टाके पडले तर पायाला मार लागला आहे त्यांची प्रकृती स्थिर आहे.
वणी : बातमीदार






