Home Breaking News श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळा

श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळा

दोन दिवस कार्यक्रमांची मेजवानी

रोखठोक |: येथील जिजाऊ नगर मधील जागृत हनुमान मंदिर ट्रस्‍टच्‍या वतीने दि. 12 व 13 फेब्रुवारीला श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त भव्‍य कार्यक्रमांची मेजवानी भाविक भक्तांना मिळणार आहे. रविवारी सायंकाळी 7 वाजता समाज प्रबोधनकार ह.भ.प. सुशिलभाऊ वनवे यांचे जाहिर किर्तन  होणार आहे.

जिजाऊ नगर परिसरात श्री संत गजानन महाराज यांचे सुंदर मंदिर आहे. या मंदिरात सतत विविध सामाजीक उपक्रम राबविल्‍या जातात. अनेक कार्यक्रमांची रेलचेल सातत्‍याने असते. श्री गजानन महाराज प्रकट दिन मोठया उत्‍साहात साजरा होणार आहे.

सोमवारी पहाटे श्री संत गजानन महाराजांचा महाअभिषेक व आरती होणार असुन सकाळी महाराजांची दिंडी व पालखी निघणार आहे. दुपारी पारायण तर मनुमहाराज तुगनायत यांचे प्रवचन होणार आहे. याचवेळी मान्‍यवरांचा सत्‍कार समारोह सुध्‍दा आयोजित करण्‍यात आला आहे. दोन दिवसीय कार्यक्रमांसाठी भाविक भक्तांनी मोठया संख्‍येने उपस्थित रहावे असे आवाहन ट्रस्टचे सर्व पदाधिकरी व परिसरातील नागरीकांनी केले आहे.
वणी: बातमीदार

Img 20250103 Wa0009