Home Breaking News वणीत एक दिवसीय पत्रकारिता प्रशिक्षण

वणीत एक दिवसीय पत्रकारिता प्रशिक्षण

232

विदर्भातील नामवंत पत्रकार करणार मार्गदर्शन
गुरुवारी वसंत जिनिंग सभागृहात शिबिर

रोखठोक |: शहरातील वसंत जिनिंग सभागृहात गुरुवार दिनांक 16 फेब्रुवारी ला एक दिवसीय पत्रकारिता कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. याप्रसंगी विदर्भातील नामवंत पत्रकार शिबिरार्थीना मार्गदर्शन करणार आहेत. स्माईल फाउंडेशन या सामाजिक संघटनेद्वारे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

आयोजित कार्यशाळा नि:शुल्क असून सकाळी 10 ते 5 वेळेत ही कार्यशाळा होणार आहे. हे शिबिर मोफत असले तरी यात पहिले नोंदणी करणा-या 70 व्यक्तींनाच प्रवेश दिला जाणार आहे. यातील 20 जागा या महिलांसाठी राखीव राहणार आहे. 18 वर्षांवरील कोणतीही व्यक्ती शिबिरात सहभागी होऊ शकणार आहेत.

आयोजित शिबिर हे दोन सत्रात होणार असून पहिल्या सत्रात पत्रकारितेची ओळख, बातमी म्हणजे काय ? बातमीमुल्य म्हणजे काय? पत्रकारातील गुणवत्ता, बातमी लेखन, बातमी लिहिण्याचे विविध प्रकार, बातमी लिखानाचे तत्व, विविध विषयाच्या बातम्या कशा लिहाव्यात? यासह प्रेस नोट लिखान, पत्रकार परिषद, भाषण-व्याख्यान बातमी, विश्लेषणात्मक बातमी, बातमीची भाषा इत्यादी विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे.

दुस-या सत्रात फिल्ड रिपोर्टिंग, मॉडर्न मीडिया, मोबाईल जर्नालिज्म, डिजिटल मीडिया (पोर्टल, यूट्यूब चॅनल), रेव्हेन्यू मॉडेल, मीडिया लॉ आणि एथिक्स यासह शिबिरार्थ्यांकडून प्रात्यक्षिक करून घेतले जाणार आहे.

वणीत प्रथमच पत्रकार प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराला वणी, मारेगाव, झरी तालुक्यातील पत्रकार तसेच पत्रकारिता क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी सहभागी व्हावे असे आवाहन स्माईल फाउंडेशनचे सागर जाधव व पत्रकार निकेश जिलठे यांनी केले आहे. अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी 9096133400 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
वणी: बातमीदार

Previous article‘लायन्स’ च्या दोन्ही संघाचे नेत्रदीपक यश
Next articleमारेगाव येथे महाआरोग्य शिबीर
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.