● प्रथमेश,श्रावस्ती,दानिश,गुणगुण व सृष्टी अव्वल
सुनील पाटील |: सुशगंगा पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी आपल्या यशाची परंपरा कायम ठेवत उज्वल यश प्राप्त केले आहे. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ (MSBTE)च निकाल जाहीर झाला असून प्रथमेश, श्रावस्ती, दानिश, गुणगुण व सृष्टी हे Top five अव्वल आलेत.

महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ (MSBTE) पॉलिटेक्निकचा हिवाळी परीक्षा 2022 चा निकाल (result) दिनांक 22 फेब्रुवारीला जाहीर झाला. सुशगंगा पॉलिटेक्निक च्या विद्यार्थ्यांनी पुन्हा यशाची परंपरा कायम ठेवत आपला “डंका” सिद्ध केला.
सुशगंगा पॉलिटेक्निकचे प्रथमेश पथाडे (82.60%), श्रावस्ती गावंडे (81.71%), दानिश शेख (81.67%), गुणगुण वाघाडे (80.71%), सृष्टी काकडे (80.57% ) यांनी आपले नावं Top five मधे स्थान पटकावले.
विद्यार्थ्यांच्या या उज्वल यशासाठी (For this brilliant achievement of students) संस्थेचे अध्यक्ष प्रदिप बोनगिरवार, प्रबंधक मोहन बोनगिरवार, प्राचार्य पुष्पा राणी, सर्व विभाग प्रमुख व प्राध्यापक यांनी विद्यार्थ्याना शुभेच्छा दिल्या व कौतुक केले.
वणी: बातमीदार