● जाधव यांची कलाकृती
रोखठोक |: वाघ व हिंस्त्र वन्य प्राण्यांच्या हल्ल्यापासून मुक्तता मिळावी यासाठी वाघ संरक्षण (Tiger protection) कवच निर्माण करण्यात आले. या कलाकृतीची राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.
तालुक्यातील परसोडा येथील अनुसूचित जाती मुलांची शासकीय निवासी शाळा येथील प्रयोगशाळा सहाय्यक विलास जाधव यांनी ही कलाकृती निर्माण केली. त्यांना हा बहुमान सलग सहाव्यांदा मिळाला आहे.
यवतमाळ येथे नुकतेच 50 वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन पार पडले. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, शिक्षणाधिकारी डॉ.जयश्री राऊत यांचे हस्ते जाधव यांना प्रशस्तीपत्र व पुरस्कार देउन सन्मानित करण्यात आले.
विलास जाधव यांनी समाजाच्या विकासात्मक आणि समस्यांना धरून नवनविन प्रयोग राज्यस्तरीय प्रदर्शनामध्ये सादर केले आहे. ते जिल्ह्यातील उत्कृष्ट प्रयोग शाळा सहाय्यक ठरले. त्यांच्या या कार्याबाबत समाजकल्याण प्रादेशिक उपायुक्त सुनिल वारे व सहायक आयुक्त भाऊराव चव्हाण यांनी शुभेच्छा सुध्दा दिल्या आहेत.
यवतमाळ जिल्ह्यमध्ये वाघापासुन तसेच हिंस्त्र वन्य प्राण्यांपासुन होणाऱ्या हल्ल्यातून वाचण्यासाठी अतिशय कमी खर्चामध्ये वाघ संरक्षण कवच निर्माण केले आहे. हे कवच परीधान केल्यास वाघाने हल्ला केला तरी मनुष्याला ईजा होणार नाही. असे मत जाधव यांनी व्यक्त केले.
वणी : बातमीदार