● गणेशपूर शिवारातील घटना
सुनील पाटील | अवघ्या 26 वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरी विष प्राशन करून जीवन संपवले. ही घटना गणेशपूर येथे गुरुवार दि. 16 मार्चला सायंकाळी 6 वाजता उजागर झाली.
सुधीर उर्फ अनिल मारोती पहापळे (26) असे मृतक तरुणाचे नाव आहे तो शहरालगत असलेल्या गणेशपूर येथील निवासी होता. सायंकाळी घरी कोणीच नसल्याचे हेरून त्याने विषारी औषध प्राशन केले.
ही बाब घरच्या मंडळींना कळताच त्याला तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी तपासणीअंती मृत घोषित केले. उत्तरीय तपासणी नंतर शव नातेवाईकांना सोपविण्यात आले असून त्याने आत्महत्या का केली हे स्पष्ट होऊ शकले नाही. पुढील तपास पोलीस करताहेत.
वणी : बातमीदार






