Home Breaking News महाराष्ट्राच्या मनातील खदखद व्यक्त करणाऱ्या नेत्याचे विचार ऐकण्यासाठी, शेकडो महाराष्ट्र सैनिक मुंबईला...

महाराष्ट्राच्या मनातील खदखद व्यक्त करणाऱ्या नेत्याचे विचार ऐकण्यासाठी, शेकडो महाराष्ट्र सैनिक मुंबईला रवाना

416

राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष
उंबरकर यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांचा जल्लोष

सुनील पाटील | मनसेच्या पाडवा मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष लागले आहे. मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या मनातील खदखद व्यक्त करणाऱ्या नेत्याचे विचार ऐकण्यासाठी, शेकडो महाराष्ट्र सैनिक मंगळवार दि. 21 मार्चला मुंबईकरिता रवाना झाले आहेत.

“तळपत्या ठाकरी विचारांचा वारसा जपण्यासाठी चला शिवतीर्थावर”, असा टिझर मनसेने प्रदर्शित केला आहे. यामुळे बाळासाहेबांच्या विचाराचे खरे वारसदार कोण ? आहेत हे पाडवा मेळाव्यात ठाकरी फटकाऱ्याने स्पष्ट होणारच आहे.

राज्यातील संपूर्ण वातावरण अस्थिर झालेले असताना पाडवा मेळाव्यात कोणती ‘राज’गर्जना होणार हे बघणे औत्सुक्याचे आहे. पाडवा मेळाव्याच्या निमित्ताने वणी विभागातील महाराष्ट्र सैनिकात कमालीचा उत्साह आणि जल्लोष संचारला आहे. तीन ट्रॅव्हल्स व चारचाकी वाहनांच्या माध्यमातून शेकडो कार्यकर्त्यांनी मुंबईकडे कूच केली आहे.
वणी : बातमीदार