Home Breaking News त्रिवार अभिनंदन….. मनसेच्या नेतेपदी राजू उंबरकर

त्रिवार अभिनंदन….. मनसेच्या नेतेपदी राजू उंबरकर

1725

विदर्भात मनसेचा बुलंद आवाज

सुनील पाटील: महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही धगधगती राजकीय संघटना आहे. राज्यात आक्रमक भूमिका घेणाऱ्या या संघटनेच्या नेतेपदावर राजू उंबरकर यांची निवड दस्तुरखुद्द राज ठाकरे यांनी केली. ते सुद्धा प्रतिष्ठेच्या असलेल्या गुढीपाडवा मेळाव्यात.

विदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची संघटनात्मक बांधणी करण्याचा विडा वणी विधानसभा क्षेत्रातील राजू उंबरकर यांनी खंबीरपणे उचलला. त्यांना अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी डिवचण्याचा, संपवण्याचा इमानेइतबारे प्रयत्न केला. ते डगमगले नाहीत, पक्ष संघटन आणि पक्षाची अस्मिता संभाळण्याचंच काम त्यांनी केलं.

वणी विधानसभा मतदारसंघात असलेलं काँग्रेसचे प्राबल्य, त्यानंतर काहीकाळ असलेलं शिवसेनेचं अस्तित्व आणि मोदी लाटेत भाजपच्या अधीन झालेल्या मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निर्माण केलेली कार्यकर्त्यांची फौज वाखाणण्याजोगी आहे.

मनसेचे राज्य उपाध्यक्ष म्हणून काम करताना उंबरकर यांनी संपूर्ण विदर्भ पिंजून काढला. संघटनात्मक बांधणीसाठी प्रयत्न केले, राज ठाकरे यांच्या विचाराने भारावलेल्या तरुणाची फौज निर्माण केली. सतत पक्षाचे ध्येयधोरणे मांडताना त्यांनी प्रबळ विरोधकांना नामोहरम केले. त्यामुळेच आज उंबरकर यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेतेपद मिळाले. ही बाब विदर्भासाठी भूषणावह नक्कीच आहे.
(रोखठोक परिवाराकडून त्रिवार अभिनंदन)