Home Breaking News election…भाजपा व महाविकास आघाडीत थेट लढत

election…भाजपा व महाविकास आघाडीत थेट लढत

● 18 जागे करीता 38 उमेदवार रिंगणात

● 18 जागे करीता 38 उमेदवार रिंगणात

Apmc election wani : कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या होवू घातलेल्‍या निवडणुकीत दोन पॅनल एकमेकांसमोर उभे ठाकणार आहे. अर्ज मागे घेण्‍याच्‍या शेवटच्‍या दिवशी तब्‍बल 47 उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. आता 18 जागे करीता केवळ 38 उमेदवार रिंगणात असुन भाजपा शिवसेना युतीचे शेतकरी एकता पॅनल व महाविकास आ‍घाडीचे शेतकरी परिवर्तन पॅनल यांच्‍यात थेट लढत होणार आहे. Two panels will face each other in the upcoming elections of the APMC

बाजार समितीच्‍या निवडणुकीची उत्‍कंठा शिगेला पोहचली आहे. तालुक्‍यातील शेतकरी हिताचे निर्णय घेणाऱ्या गटाला विजयाची आशा आहे. अनेक धुरंधर नेते या निवडणुकीत आपले कसब पुर्णत्‍वास नेणार आहे. दोन्‍ही बाजुने तुल्‍यबळ नेत्‍यांचे प्रयत्‍न सार्थकी लागणार का हे बघणे औत्‍सुक्‍याचे असुन कोण बाजी मारणार हे मत मोजणीअंती स्‍पष्‍ट होणार आहे.

अर्ज मागे घेण्‍याच्‍या शेवटच्‍या दिवशी 85 पैकी 47 उमेदवारांनी निवडणुक रिंगणातुन माघार घेतली. मोठ्या प्रमाणात दाखल झालेल्‍या नामांकण अर्जामुळे तीन पॅनल आपापसात लढणार असे मत राजकीय विश्लेषक व्‍यक्‍त करत होते. परंतु तालुक्‍यातील काही बलाढय नेत्‍यांनी सपशेल माघार घेतल्‍याचे सकृतदर्शनी दिसत आहे.

Img 20250103 Wa0009

भाजपा व शिवसेना (शिंदे गट) यांची या निवडणुकीत युती आहे. परंतु शिंदे गटाला किती जागा सोडण्‍यात आल्‍या याबाबत स्‍पष्‍टता होवू शकली नाही. आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्‍या नेतृत्‍वात ही निवडणुक लढविल्‍या जात असुन त्‍यांना विनायक एकरे यांची साथ लाभणार आहे. तर महाविकास आघाडीच्‍या वतीने कॉग्रेसचे माजी आमदार वामनराव कासावार व शिवसेना (उध्‍दव ठाकरे गट) माजी आमदार विश्‍वास नांदेकर यांनी बाजार समितीत झेंडा फडकावण्‍याची रणनिती आखली आहे.

तालुक्‍यातील राजकीय क्षेञात दबदबा असलेल्‍या नेत्‍यांनी अद्याप आपले पत्‍ते उघडले नसुन त्‍यांनी तटस्‍थ भुमीका घेतल्‍याचे दिसत आहे. सहकार क्षेञात चांगले प्राबल्‍य असणारे ऍड. देविदास काळे यांची नेमकी भुमीका काय असणार याकडे वणीकरांचे लक्ष लागले असुन त्‍यांनी आपली व्‍युहरचना अद्याप स्‍पष्‍ट केली नाही.
वणी: बातमीदार

भाजपा व शिवसेनेचे उमेदवार
विनायक एकरे,  नितीन पानघाटे, प्रभाकर बोढे, दिलीप बोढाले, मंगल बलकी, अशोक पिदुरकर, मोहन वरारकर, रामकृष्‍ण पावडे, विष्‍णुदास काळे, वैशाली राजुरकर,  मीरा पोतराजे, विजय गारघाटे, प्रकाश बोबडे, चंद्रकांत टिकरे, हेमंत गौरकार, विलास मोहाडे,  काशीनाथ काळे, हनुमान उईके

महाविकास आघाडीचे उमेदवार ●
प्रमोद वासेकर, मोरेश्‍वर पावडे, गणपत रासेकर, अरुण ताजणे, अतुल काकडे, प्रसाद ठाकरे, नरेंद्र बदखल, पंढरी राजुरकर, गिता उपरे, शितल बोबडे, प्रविण वैद्य, विजय ठाकरे, मंगल मडावी, गजानन खिरटकर, धिरज डाहूले, प्रमोद सोनटक्‍के, सतिश बडघरे, रविंद्र कोंगरे