● अपघाताची शक्यता, आनंदनगर परिसरातील घटना
Municipality wani rokhthok | अतिशय रहदारी असलेल्या मार्गावरील मोठे झाड चक्क रस्त्यावर कोसळले. त्यातच पदपथावरील वीज गुल असल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे. पालिका प्रशासनाने तातडीने रस्त्यावरील झाडाची विल्हेवाट लावावी अशी मागणी स्थानिक करताहेत. The municipal administration should immediately dispose of the tree on the road
देशमुख वाडी परिसरातून वडगाव मार्गाने आनंद नगर, जिजाऊ नगर, विठ्ठलवाडी, गुलमोहर पार्क, रवी नगर या मार्गाने जाण्याचा हा प्रमुख मार्ग आहे. या मार्गावर सुरवातीलाच असलेले मोठे झाड वादळवाऱ्याने कोसळले आहे.
दुचाकीस्वारांना अचानक मार्गावरील कोसळलेले झाड दिसत नाही यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे त्यातच पुढे मार्गक्रमण करण्याचा मार्ग बंद झालेला आहे. प्रशासनाने तातडीने रस्त्यावरील झाडाची विल्हेवाट लावावी अशी मागणी स्थानिक पातळीवर होत आहे.
वणी, : बातमीदार






