● यवतमाळ मार्गावरील घटना
accident news : रोखठोक | यवतमाळ मार्गावरील बायपासवर उभ्या ट्रक ला दुचाकी धडकली. या घटनेत एकाचा घटनास्थळी मृत्यू झाला तर दुसरा तरुण उपचारादरम्यान मृत्युमुखी पडला. ही घटना मंगळवार दि. 2 मे ला रात्री 9:30 वाजताच्या दरम्यान घडली. One died on the spot while the other youth succumbed to his injuries during treatment in the incident where the two-wheeler collided with the stationary truck.
श्रिकांत श्रीनिवास दोब्बलवार (23) हा तरूण राजूर येथील निवासी होता तर सुमित सुरेश कोमलवार (22) हा जैताई नगर मध्ये वास्तव्यास होता. असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाची नावे आहेत.
मृतक दोघे तरुण एकमेकांचे नातेवाईक आहेत. ते दोघे दुचाकी क्रमांक MH-34- BX- 7075 ने चंद्रपूर येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते. वणीला परतल्यावर ते दोघे काहीवेळ सुमित च्या घरी थांबले. त्यानंतर श्रीकांत ला राजूर येथे सोडण्यासाठी जात असताना बायपास जवळ रस्त्यावर उभा असलेल्या ट्रक क्रमांक MH-31- FC- 9993 ला भरधाव दुचाकी धडकली.
अपघात भीषण होता दुचाकी चालक श्रीकांत चा घटनास्थळीच मृत्यू झाला. जमलेल्या नागरिकांनी दोघांना रुग्णालयात हलवले. सुमितची प्रकृती गंभीर असल्याने त्याला चंद्रपूर ला हलविण्यात आले मात्र पहाटे उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
वणी: बातमीदार