Home वणी परिसर अन्‍यथा…. महामार्गावरील अस्‍ताव्‍यस्‍त उभी अवजड वाहने ‘फोडू’

अन्‍यथा…. महामार्गावरील अस्‍ताव्‍यस्‍त उभी अवजड वाहने ‘फोडू’

● mns तालुकाध्‍यक्षांचा प्रशासनाला ईशारा

937

mns तालुकाध्‍यक्षांचा प्रशासनाला ईशारा

MNS news wani | परिसरात महामार्गावर अस्‍ताव्‍यस्‍त उभी करण्‍यात आलेल्‍या अवजड वाहनांमुळे दुचाकीस्‍वारांचा नाहक जीव जात आहे. वाहतुक व्‍यवसायीकांची चाललेली मनमानी पोलीस प्रशासन खपवून घेत असली तरी महाराष्‍ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra navnirman sena) ही अनागोंदी चालु देणार नाही. एक आठवडयात त्‍यांना ताळयावर आणावं अन्‍यथा रस्‍त्‍यावरील त्‍या अवजड वाहनांना फोडण्‍यात येईल असा ईशारा मनसेचे तालुकाध्‍यक्ष फाल्‍गुन गोहोकार यांनी दिला आहे. Maharashtra Navnirman Sena will not allow this chaos. Bring them to the table in a week or else…

उपविभागातील वाहतुक व्‍यवसायीक महामार्गावर अस्‍ताव्‍यस्‍त अवजड वाहने उभी करतात. यामुळे त्‍यावर धडकून अनेक दुचाकीस्‍वारांचा मृत्‍यू झालेला आहे. तसेच लालपुलीया परिसरात रस्‍त्‍यावरील उभ्‍या ट्रकला ओव्‍हरटेक करतांना दुचाकीस्‍वार पडले आणि दुसऱ्या ट्रकने त्‍यांना चिरडले. या घटनेत दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्‍यू झाला. कायर मार्गावर सुध्‍दा दुचाकीस्‍वारांला आपला जीव गमवावा लागला. उपविभागात ट्रकला धडकुन मृत्‍यूमुखी पडणाऱ्यांची संख्‍या लक्षात घेता त्‍यांचेवर कारवाई करणे गरजेचे झाले आहे.

उपविभागात जड वाहतुकीच्या चुकीच्या धोरणामुळे निष्पाप जीव जात असतांना आपले वाहतूक विभाग जड वाहतुकीतून महिन्याकाठी लाखो रुपये गोळा करण्यात मग्न असल्‍याचा आरोप निवेदनातुन करण्‍यात आला आहे. यवतमाळ मार्गावरील लालपुलीया परिसर अपघात प्रवण क्षेञ बनले आहे.

रस्‍त्‍याच्‍या दुतर्फा अवजड वाहनांच्‍या रांगा लागलेल्‍या दिसतात. तसेच रेल्‍वे गेट जवळील सायडींग परिसरात वाहतुक व्‍यवसायीकांची चाललेली मनमानी आणि रस्‍त्‍यावरुन मार्गक्रमण करणाऱ्या वाहनचालक व प्रवाशांना होत असलेला मनस्‍ताप लक्षात घेता अशा वाहतुकदारांवर कठोर कारवाई होणे अपेक्षीत आहे.

वणी उपविभागातील महामार्गावर उभी करण्‍यात येणाऱ्या वाहनांवर पोलीस प्रशासनाने कारवाई करावी व वाहतुकीच्‍या मार्गावर अवजड वाहने उभी करण्‍यास मनाई करावी याबाबत एक आठवड्यात उपाययोजना करावी अन्‍यथा रस्त्‍यावरील अवजड वाहने फोडण्‍यात येईल असा ईशारा देण्‍यात आला आहे.

याप्रसंगी शिवराज पेचे, गुडडू वैद्य, धिरज पिदुरकर, हिमांशु बोहरा, वैभव पुराणकर,  दामोधर खिरटकर, शिवाजी गोंडे, नागो खिरटकर, पंढरी महारतळे, मेघराज महारतळे, निलेश सोनटक्‍के, अमोल महारतळे, बालु दुमोरे, राजु खिरटकर आदी महाराष्‍ट्र सैनिक उपस्थित होते.
वणी: बातमीदार