Home वणी परिसर रक्तदान हे जीवनदान, भव्य शिबीरात नोंदवा सहभाग

रक्तदान हे जीवनदान, भव्य शिबीरात नोंदवा सहभाग

● जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आयोजन

145

जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आयोजन

Police news wani | रक्तदान शिबीर हे काळाची गरज झाली आहे. ऐन वेळी जाणवणारा रक्ताचा तुटवडा रुग्णाच्या जीवितावर बेततो. रुग्णालयातील रक्तपेढीत रक्तसाठा सदोदित उपलब्ध असावा या करिता जिल्हा पोलीस दलाच्या वतीने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. Blood donation camp is the need of the hour. Lack of blood at the right time can affect the life of the patient

मंगळवार दि. 16 मेला  वणी (wani) पोलीस स्टेशनच्या आवारातील दक्षता भवनात सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजतापर्यंत रक्तदात्यांनी रक्तदान हे जीवनदान समजून आपले कर्तव्य पार पडावे असे आवाहन उप विभागीय पोलीस अधिकारी संजय पुजलवार (sanjay pujalwar) व ठाणेदार प्रदीप शिरस्कर  यांनी केले आहे.

रक्तदान हे जीवनदान आहे. रक्त हे कृत्रीमरित्या तयार करता येत नाही तसेच मानवी रक्तघटक ठराविक काळच साठविता येतात त्यामुळे सातत्याने रक्त संकलीत करणे काळाची गरज आहे. या उद्देशानेच भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

वेळेची गरज, सामाजिक कर्तव्याची जाण ठेऊन रक्तदान हे सुरु असावे यासाठी समाजसेवी संघटना, राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रक्तदात्यांनी शिबीरामध्ये रक्तदान करुन सहभाग नोंदवावा असे आवाहन वणी, मारेगाव, शिरपूर, मुकुटबन व पाटण येथील ठाणेदारांनी केले आहे.
:वणी बातमीदार