Home वणी परिसर विकास कामांची बोंबाबोंब, समस्‍यांचा विळखा

विकास कामांची बोंबाबोंब, समस्‍यांचा विळखा

● कॉग्रेस आक्रमक, पालकमंत्री यांना साकडे

412

कॉग्रेस आक्रमक, पालकमंत्री यांना साकडे

development news wani : वणी नगर पालीका हद्दीतील अनेक मुलभूत गरजा आणि विकासकामे ठप्‍प पडली आहेत. पालीका रामभरोसे असल्‍याने नागरिकांना नाहक ञास सहन करावा लागत आहे. विकास कामांची बोंबाबोंब,  समस्‍यांचा विळखा व आवास योजनेची ऐसीतैसी झालेली आहे. सर्वसामान्‍य जनतेला तातडीने न्‍याय मिळवून द्यावा अशी मागणी कॉग्रेस पक्षाचे जिल्‍हा उपाध्‍यक्ष इजहार शेख यांनी उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत पालकमंत्री यांना पाठवलेल्‍या निवेदनातुन केली आहे. There has been a bombardment of development works, a flood of problems and so has the housing scheme.

c1_20230608_18334731
निवेदन देतांना काँग्रेस कार्यकर्ते

प्रधानमंत्री आवास योजनेची अंमलबजावणी योग्‍य पध्‍दतीने होतांना दिसत नाही. अनेक लाभार्थी घरकुल योजने पासुन वंचित असल्‍याचे दिसत आहे. तर मंजूर झालेले घरकुल धारकांना अजुन पर्यंत घरकुल मिळालेले नाही. ज्या परिसरात गरजू लाभार्थी राहतात त्यांनाच या योजनेचा लाभ मिळत नसल्‍याचे वास्‍तव नाकारता येत नाही.

शहरातील गोकुळनगर, रजानगर, रंगनाथ नगर, खरबडा, रामपूरा, सेवानगर, नारायण निवास मागील भाग बरडपूरा,  गांधीनगर,  शास्त्रीनगर, रंगारीपूरा,  भोईपूरा,  बेलदारपूरा, मोमीनपुर, पंचशिलनगर, माळीपूरा पहाडपूरा, अशोकनगर, एकतानगर, जागृतीनगर, भिमनगर, दामले फैल, तेली फैल  सर्व स्लम एरीया या परिसरात मागील अनेक वर्षापासून मुलभूत गरजा पुर्णत्‍वास गेल्‍या नाहीत. तर समस्‍यांचा विळखा जैसे थे आहे. त्‍या प्रमाणेच गोकुळनगर येथील तलाव सौदर्यीकरण व लहान मुलांकरीता बगीचा होणे गरजेचे आहे.

उपरोक्‍त परिसरातील अधिकांश विभाग दलित वस्ती योजनेअंतर्गत येत आहे, तरीपण येथील नागरीकांवर अन्याय होत आहे. येथे दलित वस्ती अंतर्गत कामे झालेली नाही. रस्ते-पाणी-नाल्या-विद्युत असे अनेक समस्या या परिसरातील नागरिकांना छळत आहे. म्‍हणुनच आपण या महत्‍वपुर्ण विषयावर लक्ष देऊन तातडीने अन्याय दूर करावा अन्‍यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडावे लागेल असा इशारा निवेदनातुन देण्‍यात आला आहे.

याप्रसंगी प्रा. दिलीप मालेकार, अक्षय धावंजेवार, प्रमोद लोणारे, नईम अजिज, संतोष सिदमशेटटीवार, निलेश लांडे,  दिनेश पाउनकर, रमेश तांबे, डॉ. विवेक गोफणे, दिपक तिरमलवार, दिनेश रायपुरे यांचेसह मोठया प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.
Rokhthok News