Home Breaking News वेकोलीच्‍या त्‍या “फुकटया” कर्मचाऱ्यांवर कोण करणार कारवाई..!

वेकोलीच्‍या त्‍या “फुकटया” कर्मचाऱ्यांवर कोण करणार कारवाई..!

● कोळसा खाणीत क‍र्तव्‍यांवर असलेले बरेचशे कर्मचारी राजकीय पाठबळांचा फायदा घेत निव्‍वळ हजेरी लावतात आणि.....

1300

CMD कार्यालयासमोर MNS छेडणार आंदोलन

MNS NEWS WANI : वणी उप विभागात कोल इंडीयाच्‍या माध्‍यमातुन वेकोली व्‍दारा चालविण्‍यात येणाऱ्या कोळसा खाणीत प्रचंड अनागोंदी माजली आहे. अधिकाऱ्यांचा वचक संपुष्‍टात आल्‍याचे सकृतदर्शनी दिसत आहे. बरेचशे कर्मचारी बिनधास्‍तपणे केवळ हजेरी लावतात आणि फुकटचा पगार उचलत असल्‍याचे वास्‍तव समोर येत असल्‍याने अशा कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी मनसेने मुख्य महाप्रबंधक यांना दिलेल्‍या निवेदनातुन केली आहे. There is a lot of chaos in the coal mine. It is obvious that the officials’ words have come to an end.

Img 20250422 wa0027

उपविभागातील कोळसा खाणीत क‍र्तव्‍यांवर असलेले बरेचशे कर्मचारी राजकीय पाठबळांचा फायदा घेत निव्‍वळ हजेरी लावतात आणि कर्तव्‍य बजावत नसल्‍याचा आरोप मनसेने निवेदनातुन केला आहे. त्‍यांच्‍या या प्रकारामुळे केंद्र शासनाला (Central Govt) चांगलाच चुना लागत असुन वरिष्‍ट अधिकारी मुग गिळून गप्‍प का हा संशोधनाचा विषय झाला आहे.

Img 20250103 Wa0009

वेकोली (wcl) कर्मचाऱ्यांना शासनाच्‍या तिजोरीतुन मुबलक वेतन दिल्‍या जाते तर त्‍या बदल्‍यात कामांची अपेक्षा माञ केल्‍या जात नाही. काम न करता पूर्ण पगार उचलणाऱ्या त्‍या फुकटया कर्मचाऱ्यावर कुठलीही कार्यवाही होताना दिसत नाही. अशा लोकांची यादी सब एरिया मॅनेजर यांना माहिती असून त्‍यांचेसोबत हितसंबध तर नाही ना असा गौप्‍यस्‍फोट मनसेने निवेदनातुन केला आहे.

वेकोलीतील या अनागोंदी प्रकारामुळे केंद्र शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. याला अधिकारी स्वतः कारणीभूत असल्‍याचा आरोप करत सदर प्रकरणाची सखोल चौकशी करुन आठ दिवसात फुकटया कर्मचाऱ्यावर कारवाई करावी अशी  मागणी करण्‍यात आली आहे. अन्‍यथा वेकोली प्रशासना विरोधात महाराष्‍ट्र नवनिर्माण सेना CMD (चीफ मॅनेजिंग डायरेक्टर) नागपूर कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडणार असा इशारा देण्‍यात आला आहे.

याप्रसंगी मनसे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, लकी सोमकुवर, सुरज काकडे, मनोज बधवा, सौरभ राऊत, राजेंद्र खारकर, अविनाश जुनघरी, आदर्श मडावी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
Rokhthok News