Home क्राईम Arms : धारदार तलवारीसह तरुण अटकेत

Arms : धारदार तलवारीसह तरुण अटकेत

● पोलिसांनी घेतले ताब्यात, गुन्हा नोंद

पोलिसांनी घेतले ताब्यात, गुन्हा नोंद

Crime News |शहरातील नटराज चौकात धारदार तलवारीसह तरुण धुमाकूळ घालत असल्याची माहिती ठाणेदारांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळ गाठत 25 वर्षीय तरुणाला ताब्यात घेत भारतीय शस्त्र कायदा Arms Act नुसार गुन्हा नोंद केला आहे. ही कारवाई 11 जूनला मध्यरात्री करण्यात आली. A 25-year-old youth has been detained and a case has been registered under the Indian Arms Act.

सुमीत देविदास राखुंडे (25) असे ताब्यातील तरुणाचे नाव आहे. तो धारदार तलवार हाती बाळगून धुडगूस घालत होता. त्यातच PSI प्रवीण हिरे व दोन पोलीस कर्मचारी शहरात पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय महितगाराने दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळ गाठले.

नटराज चौकात सार्वजनिक ठिकाणी एक तरुण हातात धारदार लोखंडी तलवार घेवुन धुमाकुळ घालत असतांना दिसला. पोलिसी खाक्या दाखवत सौम्य बळाचा वापर करून स्टापच्या मदतीने त्यास तलवारीसह ताब्यात घेतले. त्याचेवर भारतीय शस्त्र कायदा नुसार गुन्हा नोंद केला आहे.

Img 20250103 Wa0009

सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ पवन बनसोड, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, SDPO गणेश किन्द्रे यांचे मार्गर्शनात ठाणेदार पो.नि प्रदिप शिरस्कर यांचे आदेशावरून पोउपनि प्रविण हिरे, वसिम, श्रीनिवास यांनी केली.
Rokhthok News