● निळापूर ब्राम्हणी मार्गावरील घटना
Wani News | उष्णतेची धग वाढत असतानाच आगीच्या घटनेत वाढ होते. येथील निळापूर- ब्राम्हणी मार्गावरील वैभव कोटेक्स या जिनिंग मधील शेड मध्ये ठेवण्यात आलेल्या जवळपास दोन हजार क्विंटल कापसाला भीषण आग लागली. आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला असून नेमके किती रुपयांचे नुकसान झाले हे स्पष्ट होऊ शकले नाही. Efforts have been made to douse the fire and it is not clear how much rupees have been lost.
ब्राम्हणी निळापूर मार्गावर मोठया प्रमाणात जिनिंग स्थापित झाल्या आहेत. दरवर्षी कुठल्यातरी जिनिंग मध्ये आगीची घटना घडतेच. यावेळी वैभव कोटेक्स मधील कापसाला आगीने कवेत घेतले. काही अवधीतच आगीने रौद्ररूप धारण केले होते.
जिनिंग परिसरातील बाहेरच्या गंजीला आग लागल्याचे कळताच जिनिंग मधील कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. कापूस खाली करत असलेल्या वाहनाचा सायलेन्सर मधून निघालेल्या चिंगारी मुळे आग लागली असावी असा कयास वर्तवण्यात येत आहे.
Rokhthok News