Home क्राईम कारवाई….दुचाकी चोरट्यांची टोळी ‘गजाआड’

कारवाई….दुचाकी चोरट्यांची टोळी ‘गजाआड’

● दोन प्रकरणातील सात चोरट्यांना गजाआड करण्‍यात पोलीसांना यश आले आहे.

934
C1 20241123 15111901

दोन मोटरसायकल हस्‍तगत

Crime News Wani | शहरात व परिसरात दुचाकी चोरट्यांनी थैमान घातले होते. दुचाकी चोरीच्‍या घटनेत कमालीची वाढ झाल्‍यामुळे पोलीसांनी तपासाची चक्रे जोराने फिरवली असता दोन प्रकरणातील सात चोरट्यांना गजाआड करण्‍यात पोलीसांना यश आले आहे. त्‍यांचे जवळुन दोन मोटर सायकली ताब्‍यात घेण्‍यात आल्‍या. ही कारवाई वणी पोलीस व ( LCB ) स्‍थानिक गुन्‍हे शाखेच्‍या पथकांनी केली. The thieves had set up a platform to loot the bike in front of the house.

उप विभागात मोटर सायकल चोरीच्‍या घटना सातत्‍याने घडत होत्‍या, बाजार पेठ, गर्दीच्‍या ठिकाणावरुन दुचाकी चोरीच्‍या घटना घडत असतांनाच चोरट्यांनी चक्‍क घरासमोरुन दुचाकी लंपास करण्‍याचा सपाटा लावला होता. या प्रकरणी स्‍थानिक गुन्‍हे शाखेचे पथक बारकाईने चोरट्यांच्या हालचाली टिपत होते तर खबऱ्या मार्फत माहिती संकलीत करण्‍यात येत होती.

तेली फैल परिसरात वास्‍तव्‍यास असलेले ईश्‍वर घाटोळे यांची दुचाकी क्रमांक MH.29.AS.8292 चोरट्यांनी लंपास केली होती. तसेच तालुक्‍यातील उमरी येथील पुंडलीक बाळकृष्ण माथनकर यांची मोटर सायकल शेत शिवारातुन चोरीला गेली होती. याप्रकरणी पोलीसात रितसर तक्रार दाखल करण्‍यात आली होती. या दोन गुन्ह्यातील तपास वणी पोलीस करत होते तर समांतर तपास स्‍थानिक गुन्‍हे शाखेच्‍या पथकाने आरंभला होता.

दुचाकी चोरीच्‍या या दोन्‍ही प्रकरणी आकाश विजय धवने (23) रा. वनोजादेवी ता.मारेगांव, आकाश विजय अक्कलवार (24) रा. शांतीनगर राळेगांव, राहुल मारोती दुर्गे (27) राजेश संतोष चितांवार (21), अक्षय अशोक चेलपेलवार (20) तीघेही रा. मुकुटबन ता. झरी, रितीक किशोर कन्नाके (23) रा. पांढरकवडा, शुभम विठठल राउत (23) रा. कोसारा ता. झरी ह.मु. आखाडा वार्ड बिरसा मुंडा चौक पांढरकवडा यांना ताब्‍यात घेण्‍यात आले. असुन त्‍यांचे जवळुन दोन दुचाकी हस्‍तगत करण्‍यात आली आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक( (SP) डॉ. पवन बंसोड, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, (SDPO) गणेश किंद्रे यांचे मार्गदर्शनात ठाणेदार अजित जाधव यांचे नेतृत्वात सुदर्शन वानोळे,  दिगांबर किनाके, सुहास मंदावार,  हरिन्दरकुमार भारती, विशाल गेडाम, पुरूषोत्तम डडमल व स्‍थानिक गुन्‍हे शाखेचे पथक (LCB)यांनी केली.
Rokhthok News

 

Previous articleत्‍याने… दुकानातच घेतला गळफास
Next articleतरुणीची फसवणूक, बळजबरीने देहविक्री
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.