Home Breaking News अनेक गावांना पुराचा वेढा अन् हेलिकॉप्टर पोहचले

अनेक गावांना पुराचा वेढा अन् हेलिकॉप्टर पोहचले

● एसडीआरएफ जवानांकडून बचावकार्य सुरू

1785

एसडीआरएफ जवानांकडून बचावकार्य सुरू

हरिश कामारकर | महागाव |

Mahagaon News | दोन दिवसापासून संततधार पावसामुळे तालुक्यांतील सर्व नदी- नाल्यांना पूर आला आहे. यामुळे अनेक गावांना पुराचा वेढा पडला आहे, यातच तालुक्यातील हिवरा संगम नजिक धनोडा व आनंदनगर भागातील 85 नागरिक संकटात सापडल्याची माहिती समोर येत आहे. प्रशासनाने बचावकार्य आरंभले असून हेलिकॉप्टरच्या माध्यमातून नागरिकांना सुखरूपस्थळी पोहचविण्यात येत आहे. The administration has started rescue operations and the citizens are being transported to a safe place through helicopters.

महागाव तालुक्यातील अनेक गावांना पुराचा फटका बसला आहे. पैनगंगा व पूस नदीने विक्राळरूप धारण केले आहे. नागरिकांना वाचविण्यासाठी स्थानिक प्रशासन हतबल झाल्याने हिवरा सर्कलचे माजी जिल्हा परिषद सदस्य साहेबराव पाटील कदम व जिल्हा बँकेचे संचालक शिवाजीराव राठोड यांनी थेट पालकमंत्री संजय राठोड यांच्याशी संपर्क साधत परिस्थितीचा आढावा सादर केला आणि बचाव कार्याच्या मोहिमेत हेलिकॉप्टर व जवान तैनात करण्याची मागणी केली.

c1_20230722_18134093

जिल्ह्यात पावसाने चांगलाच जोर धरल्याने तालुक्यातून वाहणाऱ्या पुस, पैनगंगा व शिप नदीला पूर आला. यामुळे नदी किनाऱ्यावरील अनेक गावांचा संपर्क तुटला तर सर्वत्र जनजीवन विस्कळित झाले आहे. या परिस्थितीत ये – जा करणारे व धोक्याच्या ठिकाणी वास्तव्य करणारे अनेक लोक अडकलेले आहेत. या नागरिकांना दुपार पर्यंत दोरी किंवा इतर जलवाहतूकीतून सुरक्षित जागेवर पोहविण्यासाठी स्थानिक प्रशासनाने प्रयत्न केले.

महागाव तालुक्यातील पूर परिस्थिती लक्षात घेता पालक मंत्री संजय राठोड यांनी राज्याचे मुख्य सचिव मनोज सैनिक व संबधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधला. महागाव येथे हेलिकॉप्टरची त्वरित व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या. या सूचनेनुसार दुपारी 4 वाजेपर्यंत दोन हेलिकॉप्टर व जवानांची फौज तालुक्यात दाखल झाली.

हेलिकॉप्टर सोबत आलेल्या एसडीआरएफ च्या टीमने बोटिव्दारे युद्ध पातळीवर या बचाव कार्यास सुरूवात केली. अनेकांना सुखरूप सुरक्षित ठिकाणीं हलविले आहे. याचबरोबर सदर परिस्थितीचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री संजय राठोड यांच्या कडून सातत्याने आढावा घेत कारवाईच्या सूचना देण्यात येत आहे.
Rokhthok News

Previous articleवृद्धांची नदीत उडी मारून आत्महत्या
Next articleपैनगंगा फुगली, शेतात शिरले पाणी
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.