Home Breaking News Dry day….आज दारू दुकाने बंद, मद्यपींचा हिरमोड

Dry day….आज दारू दुकाने बंद, मद्यपींचा हिरमोड

● कलम 142 (2) अन्वये ठाणेदारांचा आदेश

कलम 142 (2) अन्वये ठाणेदारांचा आदेश

Wani News | वणी परीसरात मोहरम विसर्जन मिरवणुक मोठया उत्साहात साजरी करण्यात येते. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 142 (2) अन्वये ठाणेदार अजित जाधव यांनी शनिवार दिनांक 29 जुलै ला सकाळी 8 वाजतापासून रात्री 11 वाजे पर्यंत वणी हद्दीतील संपूर्ण दारू दुकाने बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित केले आहे. An order has been issued to shut down all the liquor shops in Wani.

वणी परिसर औद्योगिक दृष्ट्या परिपूर्ण आहे यामुळे अधिकारी, कर्मचारी व कामगारवर्ग मोठया प्रमाणात येथे स्थायिक झालेला आहे. मदिरापान हा छंदच नव्हे तर शौक झालेला आहे. व्यसनाच्या आहारी गेलेले अनेक तरुण शहरात बघायला मिळतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

पोलीस स्टेशन हद्दीत मोठया प्रमाणात देशी विदेशी दारूची दुकाने आहेत. त्याप्रमाणेच शहराच्या सभोवताल ढाबे आहेत. दारूची चंगळ नित्याचीच आहे मात्र मोहरम विसर्जनची निघणारी भव्य मिरवणूक यामुळे कोणताही अनुचित प्रकार होऊ नये याची खबरदारी म्हणून सि. एल.- 3, एफ एल-3, सी.एल.- 2, एफ. एल. -2 तसेच बियर शॉपी बंद ठेवणे बाबत आदेशीत करण्यात आले आहे.

Img 20250103 Wa0009

ठाणेदारांनी निर्गमित केलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्यास अनुज्ञप्ती धारक यांचे विरूध्द महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये अटी व शर्तीचे भंगाची कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच अनुज्ञप्ती परवाना कायम स्वरूपी रदद करण्या बाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
Rokhthok News