Home Breaking News लालगुडाच्या सरपंचपदी ‘गीता उपरे’

लालगुडाच्या सरपंचपदी ‘गीता उपरे’

● सरपंच यांच्या निधनामुळे पद होते रिक्त

सरपंच यांच्या निधनामुळे पद होते रिक्त

Wani News | वणी लगतच असलेल्या लालगुडा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी महाविकास आघाडीच्या गीता उपरे विजयी झाल्या आहे. Geeta Upare of Mahavikas Aghadi has won the post of Sarpanch

लालगुडा येथील सरपंच धनराज चालखुरे यांचे आजाराने निधन झाले होते. त्यामुळे सरपंच पद रिक्त होते, सरपंच पदा करिता दि 31 जुलैला निवडणूक घेण्यात आली होती. सरपंच पदा करिता गीता उपरे व वंदना चामाटे यांनी नामांकन अर्ज दाखल केल्याने निवडणूक घेण्यात आली.

यावेळी 10 पैकी 9 सदस्य उपस्थित होते तर 1 सदस्य गैरहजर होता. गीता उपरे याना 5 मते तर वंदना चामाटे याना 4 मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी गीता उपरे यांना विजयी घोषीत केल्याने त्या लालगुडाच्या सरपंच पदी विराजमान झाल्या आहेत.

Img 20250103 Wa0009

गीता उपरे ह्या शिवसेना (ठाकरे गट) च्या माजी महिला जिल्ह्या संघटक होत्या. पीठासीन अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी नितीन बांगडे यांनी काम पाहिले.
Rokhthok News