Home वणी परिसर क्रेडाईचे अध्‍यक्ष दिकुंडवार तर सचिवपदी निमकर

क्रेडाईचे अध्‍यक्ष दिकुंडवार तर सचिवपदी निमकर

● बांधकाम व्‍यवसायीक व ग्राहकांच्‍या हिताचे काम करणारी प्रसिध्‍द संघटना म्‍हणुन क्रेडाई ओळखल्‍या जाते.

340

सर्वानुमते कार्यकारणीची निवड

Wani News | बांधकाम व्‍यवसायीक व ग्राहकांच्‍या हिताचे काम करणारी प्रसिध्‍द संघटना म्‍हणुन क्रेडाई ओळखल्‍या जाते. देशातील 21 राज्यात क्रेडाईचे काम सुरु असून महाराष्ट्रात सध्या 62 शहरामध्ये हि संघटना कार्यरत आहे. या संघटनेच्‍या अध्‍यक्षपदी किरण दिकु्ंडवार तर सचिव संजय निमकर यांचे सह सन 2023-25 ची कार्यकारणी सर्वानुमते निवडण्‍यात आली. Kiran Dikundwar is the president of CREDAI organization and Sanjay Nimkar is the secretary

बांधकाम व्यावसायिकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्याचबरोबर वणीकरांना दर्जेदार निवासाचे प्रकल्प बहाल करण्यासाठी आणि शहरांच्या विकासामध्ये भर घालण्यासाठी क्रेडाई ही संघटना कटीबध्‍द आहे. बांधकाम व्यावसायिकांना एकत्र आणून त्याच्या समस्‍येंचे निराकरण करणे व वणीकरांना निवासाच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देणे हा मुख्‍य उददेश संघटनेचा आहे. त्याच बरोबर संघटनेच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबविण्‍यात येत असल्‍याचे दिकुंडवार यांनी स्‍पष्‍ट केले.

क्रेडाई संघटनेचे उपाध्‍यक्ष म्‍हणुन विवेक ताटेवार,  खजिनदार मनीष चौधरी, मॅनेजिंग कमिटी सदस्य– राजेश झिलपिलवार,  रमेश सुंकूरवार, संजय कोडगीवार, राम पोदुतवार, विजय चोरडिया, सुनील देरकर, सुनील कातकडे, निलेश कटारिया, मनीष कोंडावार, अनिल उत्तरवार, अशोक भंडारी, सुशील मुथा, दामोधर देठे,  शैलेश तोटेवार, श्रीकांत गारघाटे, जमीर खान,  देवराव भगत, संजय पोटदुखे,  निकेत गुप्ता, विनोद खुराना, आशिष काळे,  केतन गुंडावार, विवेक पांडे, सुहास गटलवार, राजू विराणी, अजिंक्य मत्ते, सुधीर गाडगे, बंटी कोठारी, सुधीर चोरडिया, जय आबड, हितेन अटारा,  अनुज मुकेवार, संदीप जयस्वाल, आचल जोबनपुत्रा, सुरज महातळे, निखील केडीया, राहुल कुचनकर, पंकज गुप्ता, साहिल सलाट अशी कार्यकारणी जाहिर करण्‍यात आली आहे.
Rokhthok News