Home Breaking News नाला खोलीकरण चुकीचे, गावाला पुराचा धोका

नाला खोलीकरण चुकीचे, गावाला पुराचा धोका

● गाव विकासाची ऐसीतैसी

640
Img 20241016 Wa0023

गाव विकासाची ऐसीतैसी

Pandhrkawada News | ढोकी ग्रामपंचायतीच्‍या माध्‍यमातुन हनुमान मंदिराजवळ होत असलेल्‍या नाला खोलीकरणात प्रचंड अनागोंदी आढळुन येत आहे. नाला खोलीकरण चुकीचे होत असल्‍याने भविष्‍यात गावाला पुराचा धोका निर्माण होणार असल्‍याचा आरोप करत अशोक चौधरी यांनी तहसीलदार यांना निवेदन देत तात्‍काळ मोका पाहणी करुन दोषीवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. Ashok Chaudhary gave a statement to the Tehsildar, alleging that the village would face flood risk in future.

c1_20230802_13341361

केळापुर तालुक्‍यातील ढोकी गावात गाव विकासाची ऐसीतैसी होतांना दिसत आहे. गाव विकासाच्‍या कामात कोणत्‍याही प्रकारे हलगर्जी, मनमर्जी होवू नये याकरीता नागरीकांनी सजग असणे गरजेचे झाले आहे. नाला खोलीकरणात ग्रामपंचायत सचिव व कंञाटदार मनमानी करत असल्‍याचा आरोप निवेदनातुन करण्‍यात आला आहे.

ग्रामपंचायतीच्‍या माध्‍यमातुन गाव विकासाच्‍या दृष्‍टीने विविध विकास कामे होत असतात. ग्रामपंचायत सचिव, सदस्‍य व कंञाटदार हे संगनमताने विकास निधींचाच अयोग्‍य विल्‍हेवाट लावत असल्‍याचा आरोप चौधरी यांनी निवेदनातुन केला आहे.

नाला खोलीकरणाच्‍या कामात होत असणारी अनियमितता गावासाठी हानीकारक ठरणार आहे. गावाला भविष्‍यात पुरसदृष्‍य परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे. तरी योग्‍य ती कारवाई करावी असे निवेदन केळापुर तहसीलदार यांना देण्‍यात आले आहे.
Rokhthok News