Home Breaking News विनयभंग…. दोन घटनेतील दोघांना अटक

विनयभंग…. दोन घटनेतील दोघांना अटक

● वणी व राजुर कॉलरी मधील घटना

वणी व राजुर कॉलरी मधील घटना

Wani Crime News |शहरातील एका प्रभागात वास्‍तव्‍यास असलेल्‍या 10 वर्षीय बालीकेला मोबाईल वर चिञपट दाखविण्‍याचा बहाना करत विनयभंग करण्‍यात आला. तर दुसऱ्या घटनेत पाणी पिण्‍याच्‍या बहान्‍याने घरात येवून महिलेचा हात पकडला अशी तक्रार दाखल करण्‍यात आली. याप्रकरणी दोघांना पोलीसांनी अटक केली आहे. Two people have been arrested by the police in connection with the complaint filed.

नासीर शेख मो. शेख (25) हा शास्‍ञीनगर तर वैभव उर्फ दत्ता नागोजी पिदुरकर हा राजुर कॉलरी येथील निवासी आहे. दोन्‍ही प्रकरणातील हे दोघे आरोपी आहेत. एक घटना दिनांक 25 जुलै ला उघडकीस आली तर दुसरी घटना 3 ऑगस्ट ला घडली आहे.

घरा शेजारी राहणारी बालीका आपल्‍या घराच्‍या अंगणात खेळत असतांना नासीर याने तीला मोबाईल वर चिञपट दाखवतो असे म्‍हणत स्‍वतःच्‍या घरात नेले. अश्‍लील चाळे करत तो छेडत असतांना बालीकेने पळ काढला व पारिवारिक मंडळींना घडलेली बाब सांगीतली. कुटूंबियांनी तातडीने पोलीसात धाव घेत आपबिती कथन केली. ही घटना दिनांक 25 जुलै ला उघडकीस आली.

Img 20250103 Wa0009

दुसरया घटनेत राजुर कॉलरी येथे विवाहीत महिला घरात एकटीच असतांना वैभव याने पिण्‍याचे पाणी मागण्‍याचा बहाना करत घरात शिरला व वाईट हेतूने त्‍यांने पिडीतेचा हात पकडला. तिने आरडाओरड केले असता त्‍याने पळ काढला. याबाबत पिडीतेने वणी पोलीसात रितसर तक्रार दाखल केली आहे. ही घटना 3 ऑगस्ट ला घडली

पोलीसांनी विनयभंग करणाऱ्या आरोपींवर गुन्‍हे नोदवले आहेत. नासीर शेख याचेवर पोक्‍सो सह भांदवि कलम  354 (अ) तर वैभव याचेवर भांदवि कलम 354 (ड), 452 नुसार गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे. याप्रकरणी ठाणेदार अजित जाधव यांचे मार्गदर्शनात सपोनि दत्‍ता पेंडकर व जमादार प्रभाकर कांबळे पुढील तपास करताहेत.
Rokhthok News