● “रस्तारोको” माञ अधिकारी फिरकले नाहीत
Shivsena News Wani | शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख संजय निखाडे यांच्या नेतृत्वात शिंदोला येथे अनोखे आंदोलन करण्यात आले. रस्ते बांधकामाची उच्चस्तरीय चौकशी व वेकोलीच्या माध्यमातून होणाऱ्या वाहतुकीवर प्रतिबंध लावावा ही मागणी रेटून धरली. यावेळी नयनपाल महाराजांनी प्रबोधन आणि 70 रक्तदात्यांनी रक्तदान करुन निषेध नोंदवला. स्थानिक नागरिक व शिवसैनिकांनी रस्तारोको केल्यामुळे वाहतुक खोळंबली माञ कोणताही अधिकारी आंदोलनस्थळी फिरकला नाही. A unique protest was held in Shindola under the leadership of Shiv Sena Thackeray group’s Sanjay Nikhade.
उपविभागातील रस्त्यांची वेकोलीच्या बेजबाबदारपणामुळे प्रचंड दुरवस्था झाली आहे. नव्यानेच बांधण्यात आलेल्या रस्त्याची वहन क्षमता आणि त्या मार्गावरून दररोज पाचपट वजनाची हजारो अवजड धावताहेत. यामुळे उपविभागातील संपूर्ण रस्ते बाधित झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना यातना सहन कराव्या लागत आहे.
उपविभागात बांधण्यात आलेले रस्ते निकृष्ट की अवजड वाहनातून होणारी वाहतूक बेकायदेशीर हे तपासण्याची गरज असतांना संबधीत अधिकारी आणि लोकप्रतिनीधी मुग गिळून गप्प आहेत. अनेक वेळा निवेदने देण्यात आले माञ प्रशासन कुंभकर्णी झोपेत असल्याचे वास्तव नाकारता येत नाही. रस्त्याची अवस्था अतिशय दयनिय झाली आहे. धुलीकण प्रदुषणामुळे शेतीची उत्पादन क्षमता घटली आहे. यासर्व बाबीला वेकोली प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप निखाडे यांनी केला आहे.
संजय निखाडे यांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन देत दहा दिवसांचा अल्टीमेटम दिला होता. माञ कोणतीही कार्यवाही न झाल्याने प्रबोधन आणि रक्तदान करुन प्रशासनाचा निषेध करण्यात आला व रस्तारोको करुन आंदोलन करण्यात आले. यापुढील आंदोलन हे तीव्र स्वरुपाचे असेल असे निखाडे यांनी स्पष्ट केले आहे.
एक महिन्यांच्या आत वेकोली प्रशासन, महसुल विभाग व कृषी विभागाने संयुक्तरित्या शेतीची पाहणी करुन शेतकऱ्यांना मोबदला द्यावा. उपविभागातील रस्ते बांधकामाची उच्चस्तरीय चौकशी करुन कंञाटदारांना काळया यादीत समाविष्ठ करावे व वेकोलीच्या माध्यमातुन चालणाऱ्या अवजड वाहनांना प्रतिबंध घालावे अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा एक महिन्यानंतर शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा ईशारा यावेळी देण्यात आला आहे.
Rokhthok News