● नियमबाहय रस्ता, अधिकाऱ्यांचे निलंबन करा
Wani News | वणी शहरातील वरोरा मार्गावर अंदाजे 22 कोटी रुपये खर्च करुन सिमेंट कॉक्रीटचा रस्ता बांधण्यात येत आहे. आता पर्यंत रस्त्याचे 30 टक्के काम झाले आहे. यात मोठा भ्रष्ट्राचार झाल्याचा आरोप करत नियमबाह्यरीत्या झालेल्या बांधकामामुळे संबधीत विभागाच्या अधिकाऱ्यांना निलंबीत करण्यास राज्य सरकारला भाग पाडावे अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेटटीवार यांना शिवसेना (ठाकरे गट) माजी उप जिल्हाप्रमुख दिपक कोकास यांनी केली आहे. The officials of the concerned department should be suspended due to illegal construction
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातुन शहरात सिमेंट कॉक्रटचा रस्ता निर्माणाधीन आहे. काही प्रमाणात रस्त्याचे काम झाले आहे माञ वर्क ऑर्डर प्रमाणे काम करण्यात आले नाही. भ्रष्ट्राचाराचे कुरण ठरलेल्या या रस्ता बांधकामामुळे विविध अडचणी निर्माण झाल्या आहेत. अर्धवट नियमबाहय पध्दतीने बांधण्यात आलेल्या रस्त्यामुळे मोठया अपघाताची शक्यता बळावल्याची शंका निवेदनातुन व्यक्त करण्यात आली आहे.
या मार्गावर शाळा, महाविद्यालये, शिकवणी वर्ग असल्याने विद्यार्थी, विद्यार्थिनींची मोठी वर्दळ असते तर हा महत्वपुर्ण मार्ग असल्याने चंद्रपुर, नागपुर कडे जाणारी वाहने याच मार्गावरुन धावतात. दोन महिन्या पासुन रस्त्याचे बांधकाम बंद असल्याने स्थानिकांना मोठया प्रमाणात यातना सहन कराव्या लागत आहे.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना आर्जव करण्यात आले की, नियमबाह्य बांधण्यात आलेल्या रस्त्याला तोडून पुन्हा नव्याने वर्क ऑर्डर प्रामणे रस्त्याचे निर्माण करावे. तसेच याला जबाबदार असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निलंबीत करण्यासाठी राज्य सरकारला भाग पाडावे अशी मागणी करण्यात आली आहे. याप्रसंगी सुधीर थेरे यांची उपस्थिती होती.
Rokhthok News






