Home Breaking News मराठयांना ‘कुणबी’ जात प्रमाणपत्र देऊ नका..!

मराठयांना ‘कुणबी’ जात प्रमाणपत्र देऊ नका..!

● कुणबी समाजाचे शासनाला निवेदन

767
Img 20241016 Wa0023

कुणबी समाजाचे शासनाला निवेदन

Wani News :- मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी केली जात आहे. या मागणीला कुणबी समाजाकडून सर्वत्र विरोध होत आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीचे- जात प्रमाणपत्र दीले जाऊ नये या मागणीचे निवेदन कुणबी समाजाच्या वतीने येथील (SDO) उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दिनांक 11 सप्टेंबरला  देण्यात आले. A statement was given on behalf of the Kunbi community demanding that the Kunbi caste certificate should not be given to the Maratha community.

कुणबी जातीला आरक्षणासाठी ओबीसी (OBC) प्रवर्गात समावेश आहे. आधीच या प्रवर्गात 400 पेक्षा अधिक जातींचा समावेश आहे. शासनाने लोकसंखेनुसार 27 टक्के आरक्षणही लागू केले नाही. त्यामुळे आता मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र दिल्यास ही बाब ओबीसी प्रवर्गावर अन्याय करणारी ठरणार आहे.

शासनाने मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण देण्यास कुणबी समाजाचा विरोध नाही. शासनाने त्यांना स्वतंत्र आरक्षण लागु करावे. मात्र मराठा समाजाच्या दबावाला बळी पडून त्यांना कुणबी जातीचे जातप्रमाणपत्र दीले गेल्यास सकल कुणबी समाज आपल्या न्याय व हक्कासाठी लोकशाही पद्धतीने तीव्र स्वरुपाचे आंदोलन करेल अशी ईशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

यावेळी रुद्रा कुचनकार, विजय पिदूरकर, जयसिंग गोहोकार, पांडुरंग टोंगे, टिकाराम कोंगरे, नारायण गोडे, जगदीश ढोके सह शेकडो कुणबी समाजबांधव उपस्थित होते.
Rokhthok News