Home क्राईम विद्यानगरी परिसरात चोरट्यांचा धुडगूस

विद्यानगरी परिसरात चोरट्यांचा धुडगूस

● चार ते पाच घरी चोरीचा प्रयत्न ● गस्त वाढवण्याची गरज

1326

चार ते पाच घरी चोरीचा प्रयत्न
गस्त वाढवण्याची गरज

Wani Crime News | चोरटे सैरभैर झाल्याचे दिसून येत असून मिळेल त्यावर हात साफ करताना दिसत आहे. बंद घरांना प्रामुख्याने लक्ष करण्यात येत असून विद्यानगरी परिसरात चोरट्यांनी धुडगूस घातला आहे. शनिवारी मध्यरात्री चार ते पाच घरी चोरीचा प्रयत्न करण्यात आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. Four to five house burglaries were attempted on Saturday midnight in Vidyanagari area

c1_20230916_10210718

विद्यानगरी परिसरात वास्तव्यास असलेले प्रकाश धुळे हे शुक्रवारी रात्री आपल्या परिवारासह झोपलेले होते. मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास स्वयंपाक घराच्या दरवाज्यामधून चोरटे घरात शिरण्याचा प्रयत्न करत होते. अचानक आलेल्या आवाजामुळे धुळे कुटुंबियांची झोप उडाली आणि आरडाओरडा केल्याने चोरट्यांनी पळ काढला.

विद्यानगरी परिसरातील धनराज डवरे हे पोळ्यानिमित्त बाहेरगावी गेले होते. घर बंद असल्याचे दिसून आल्याने चोरट्यांने घरात प्रवेश केला. मौल्यवान ऐवजाच्या शोधात सामानाची फेकफाक केली. चोरट्यांच्या हाती काय लागले हे स्पष्ट झाले नाही.

धाडसी महिलेने चोरांना पिटाळून लावले
मागील काही दिवसांपूर्वी विद्यानगरी लगत असलेल्या द्वारका नगरी परिसरात चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. एका घरात शिरलेल्या चोरट्याच्या डोळ्यात धाडसी महिलेने मिरची पावडर फेकून पिटाळून लावले होते.

शहरालगत असलेल्या पटवारी कॉलनी, विद्या नगरी , अयोध्या नगरी, द्वारका नगरी, मेघदूत कॉलनी, पद्मावती नगरी, दामोदर नगर परिसरात चोरट्यांचे विशेष लक्ष आहे. पोलीस प्रशासनाने गस्त वाढवणे गरजेचे झाले आहे.
Rokhthok News