Home Breaking News Career….तरुण तरुणींना रोजगारांची सुवर्णसंधी

Career….तरुण तरुणींना रोजगारांची सुवर्णसंधी

● मनसे रोजगार मेळाव्याचा मुहूर्त ठरला ● देशातील नामवंत कंपन्या होणार सहभागी

1297
मनसे रोजगार मेळाव्याचा मुहूर्त ठरला
देशातील नामवंत कंपन्या होणार सहभागी

Mns Career News | वणी विधानसभा मतदारसंघातील शिक्षित आणि कुशल तरुण तरुणींना यशस्वी करिअर सुरु करण्याची सुवर्णसंधी मिळावी या उद्देशाने मनसे पक्ष नेते राजु उंबरकर यांच्या संकल्पनेतून भव्‍य रोजगार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी देशातील 80 पेक्षा अधिक उद्योग, सेवा आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील नामवंत कंपन्या या रोजगार महोत्सवात सहभागी होणार आहे. 21 सप्टेंबर पासून फॉर्म भरणे होणार सुरू असुन 03 डिसेंबरला भव्य रोजगार मेळावा आयोजीत करण्‍यात आला आहे. A grand employment festival has been organized with the concept of MNS party leader Raju Umbarkar.

c1_20230917_12284883

सत्‍ताधारी लाकप्रतिनिधींच्‍या आडमुठे धोरणामुळे बेरोजगार तरुण तरुणी कायम उपेक्षीत राहत असल्‍याचे चिञ सर्वञ बघायला मिळते. तरुणांईच्‍या हाताला काम देण्‍याची धमक केवळ महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेत असल्‍याचे वक्‍तव्‍य पञपरिषदेत मनसे नेते राजु उंबरकर यांनी केले. युवा बेरोजगारांचा ज्‍वलंत प्रश्‍न उभा ठाकला आहे. अनेक प्रयत्‍नांती खचलेला बाप आणि निराश झालेला युवक असे विदारक चिञ बघायला मिळत असनु याला सर्वस्‍वी राजकीय उदासिनता कारणीभूत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

रोजगार मेळाव्यामध्ये वणी विधानसभा क्षेत्रातील तरुण तरुणींना प्रथम प्राधान्य देण्यात येणार असल्‍याचे मनसे नेते राजू उंबरकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. विदेही सद्गुरू श्री जगन्नाथ महाराज भांदेवाडा यांच्या चरणी नतमस्‍तक होत दिनांक 21 सप्टेंबर पासून फॉर्म भरायला सुरुवात होत आहे. त्यानंतर उमेदवारांकरीता मुलाखत पूर्व प्रशिक्षण सुद्धा घेण्‍यात येणार आहे.

वणी मारेगाव व झरी तिन्ही तालुक्यामध्ये मुलाखत पूर्व प्रशिक्षण पार पाडल्यानंतर डिसेंबर महिन्यात 03 तारखेला रोजगार मिळवायचे आयोजन करण्यात आलेले आहे. यावेळी 5000 पेक्षा अधिक पदांसाठी थेट मुलाखती घेतल्या जाणार आहे. सदर रोजगार मेळाव्यामध्ये उमेदवारांना मुलाखत आणि लगेच नियुक्तीपत्र प्रदान करून देशातील नामवंत कंपन्यांमध्ये रोजगाराची संधी मनसेच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.

उमेदवारांना रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होण्याकरिता ऑफलाइन व ऑनलाईन दोन्ही पद्धतीने नोंदणी करता येणार असून QR कोड द्वारा उमेदवाराना संपूर्ण नोंदणी फॉर्म भरता येणार आहे. रजिस्ट्रेशन लिंक वरून रोजगार मेळाव्या संदर्भात सविस्तर माहिती प्राप्त होणार आहे. युवकांना मुलाखतीमध्ये उत्तीर्ण होण्याकरिता मुलाखत पूर्व प्रशिक्षणाची आवश्यकता असते त्यामध्ये मुलाखतीचे बारकावे, फॉर्म संदर्भात आवश्यक माहिती तसेच रोजगार मेळाव्यातील संपूर्ण मार्गदर्शन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची चमू करणार आहे.
Rokhthok News