● मतदार संघातील 32 कामांकरीता 5 कोटी
Development News Wani | वणी विधानसभा क्षेञातील नागरी व ग्रामीण भागातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांमधील विविध विकास कामांना मंजुरी देण्यात आली आहे. तब्बल 32 गावातील कामांसाठी शासनाने 5 कोटी रुपयांचा निधी मंजुर केला असुन 30 टक्के निधींचे वितरण सुध्दा करण्यात आले आहे. सर्वाधिक 2 कोटी रुपयांचा निधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजीक भवनाचे बांधकाम व संरक्षक भिंती करीता राजुर कॉलरी येथे देण्यात आला आहे. A fund of Rs 2 crore. For the construction of Babasaheb Ambedkar Samajik Bhavan and protective walls at Rajur colliery.

आमदार संजीवरेडडी बोदकुरवार यांनी मतदार संघातील विकास कामांकरीता आजपर्यंत घसघशीत निधी खेचून आणला आहे. नुकताच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचे मार्फत नागरी व ग्रामीण क्षेत्रातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांमध्ये मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर” सामाजिक विकास योजनेंतर्गत सन 2023-24 या वर्षासाठी निधींची तरतुद करण्यात आली आहे.
तालुक्यातील राजुर कॉलरी येथे स्थानिक नागरीकांच्या मागणी नुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजीक भवनाचे बांधकाम व संरक्षक भिंत याकरीता दोन कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. तर प्रथमतः 30 टक्के रक्कम वितरीत करण्यात आली आहे. याबाबत आ. बोदकुरवार यांनी दिक्षाभुमी बुध्द विहार कमेटीचे अध्यक्ष व सचिव यांना पञ देत सुचित सुध्दा केले आहे.
वणी विधानसभा क्षेञातील तिन्ही तालुक्यातील अनेक गावात विकास कामांकरीता निधी मंजुर करण्यात आला आहे. वणी तालुक्यातील पुरड, चिलई, पिंपरी कायर, तेजापुर, आमलोन, राजुर इजारा, नांदेपेरा, बोरगांव, लालगुडा, बेलोरा, कवडशी, मांजरी, शिरपुर, चिखली, येणक, चेंडकापुर तर झरी तालुक्यातील धानोरा, मांगली, सतपल्ली, राजुर गोटा, मुकूटबन, लिंगटी, बोपापुर, बाळापुर व मारेगांव तालुक्यातील मार्डी, बांमर्डा, हिवरा, देवाळा, बोटोणी, वनोजा देवी या गावात सिमेंट रस्ता, भुमीगत नालीचे बांधकाम, समाज मंदिर आदी कामांकरीता निधी मंजुर करण्यात आला आहे.

वणी विधानसभा क्षेञातील शहर व ग्रामीण भागातील विविध विकास कामांकरीता निधींची कमतरता पडू देणार नाही याची ग्वाही आमदार बोदकुरवार यांनी दिली आहे. वणी शहरातील संपुर्ण अंतर्गत रस्ते सिमेंट कॉक्रीटीकरण करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. त्या प्रमाणेच ग्रामीण भागात शासनाच्या नानाविध योजनेच्या माध्यमातुन निधी खेचून आणणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
Rokhthok News