Home Breaking News बापरे….विस लाख रुपयांचे किटकनाशक जप्‍त

बापरे….विस लाख रुपयांचे किटकनाशक जप्‍त

● जिल्हा गुणनियंत्रण पथकाची कारवाई

7449

जिल्हा गुणनियंत्रण पथकाची कारवाई

Wani News | आदिवासी बहुल झरी जामणी तालुक्‍यात काही भामटयांनी शासन व शेतकऱ्यांची फसवणुक करण्‍याचा धंदाच अवलंबला आहे. वेगवेगळ्या प्रकारचे किटकनाशके तसेच कृषी संजीवके अवैद्यरीत्या विकत असल्‍याची गोपनिय माहिती मिळताच जिल्हा गुणनियंत्रण पथकाने शुक्रवार दिनांक 22 सप्‍टेंबरला राञी धाडसञ अवलंबले. या कारवाईत 20 लाख 94 हजार 569 रुपयांचे किटकनाशके जप्‍त केले आहे. The business of deceiving the government and farmers has been followed.

Img 20250422 wa0027

रमणय्या सुभरायडु राविल्ला असे अवैद्यरीत्या किटकनाशकाची साठवणुक करणाऱ्याचे नांव आहे. ते अडेगांव येथील निवासी असुन त्‍यांचे शेतात घर आहे. त्‍यांच्‍या घरात अवैद्यरीत्या 27 वेगवेगळ्या प्रकारचे किटकनाशके तसेच कृषी संजीवके असल्‍याची गोपनिय माहिती जिल्हा गुणनियंत्रण पथकाला मिळाली होती.

Img 20250103 Wa0009

c1_20230923_14150835

जिल्हा गुणनियंत्रण पथकाने विस्‍तृत माहिती संकलीत करुन धाडसञ अवलंबले. संबधीत व्‍यक्‍ती किटकनाशक नोंदणी प्रमाणपत्रा शिवाय किटकनाशके शेतकऱ्यांना विक्री करीता आणले असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले. घराची झाडाझडती घेतली असता तब्‍बल विस लाख रुपये किमतीच्‍या वर मुद्देमाल आढळुन आला.

याप्रकरणी कृषी अधिकारी पंचायत समिती झरी जामणी संतोष गिरी यांच्‍या तक्रारीवरुन रमणय्या सुभरायडु राविल्ला याचे विरुध्‍द मुकूटबन पोलीस ठाण्‍यात भादवि कलम 420 भा.द.वि. व सहकलम 18, 29, (B), (C) (D) किटकनाशके अधिनियम 1968 नुसार गुन्‍हा नोंद करण्‍यात आला.

सदर कारवाई जि.प. कृषी विकास अधिकारी राजेंद्र माळोदे,  जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक कल्याण पाटील, कृषी अधिकारी पं.स. वणी संजय वानखडे यांनी केली. याप्रसंगी पोलीस निरीक्षक सुरेश मस्के व पोलीस कर्मचारी संदीप कुमरे, देवुबाई मेश्राम यांनी सहकार्य केले.
Rokhthok News

Previous articleदुःखद….सुनील चोपणे यांचे निधन
Next articleखबरदार….विद्यार्थ्यांना ञास होत असेल तर..!
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.