● रस्ता बांधकामाची गुणवत्ता तपासा
● संजय निखाडे यांचा अल्टीमेटम
Wani News | चारगांव, शिंदोला ते कळमना हा कोट्यवधी रुपये खर्चकरुन निर्माण केलेल्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. रस्ता अवजड वाहनांच्या क्षमतेन्वये बांधण्यात आलेला नसल्याने पुरता बोजवारा उडाला आहे. त्या रस्ता बांधकामाची तात्काळ गुणवत्ता तपासणी करावी व संबधीत अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना (ठाकरे गट) उप जिल्हा प्रमुख संजय निखाडे यांनी निवेदनातून केली आहे.
The road from Chargaon, Shindola to Kalamana, built at the expense of crores of rupees, has potholes.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी झोपेचे सोंग घेवून वावरत असल्याचे वास्तव नाकारता येत नाही. अवघ्या काही महिन्यांपुर्वी नव्यानेच बांधण्यात आलेला रस्ता पुर्णतः उखडला आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामार्गावरुन मोठया प्रमाणात अवजड वाहनांची वर्दळ असते. कोळसा, सिमेंट व गौण खनिजांचे अवजड वाहने या मार्गावरुन धावत असल्याने नविन बांधण्यात आलेला रस्ता क्षतीग्रस्त झाल्याचा आव अधिकारी आणताहेत.
महत्प्रयासाने चारगांव ते शिंदोला या मार्गाचे बांधकाम करण्यात आले आहे. कंञाटदारांच्या अंतर्गत वादामुळे न्यायालयीन प्रक्रियेत रस्त्याचे बांधकाम अडकले होते. यामुळे परिसरातील स्थानिक नागरीकांना अतोनात ञास सहन करावा लागला होता. न्यायालयीन निर्णयानंतर रस्त्याचे बांधकाम करण्यात आले माञ अवजड वाहनांच्या वहन क्षमतेनुसार बांधकाम करण्यात आले नाही असा आरोप संजय निखाडे यांनी केला आहे.
चारगांव ते शिंदोला यामार्गावरुन खनिजांची अवजड वाहनांतुन होणारी वाहतुक मोठया प्रमाणात आहे. अवजड वाहनाचे चालक मधील दोन्ही चाके वर उचलुन मार्गक्रमण करत असल्याने ती वाहने प्रादेशीक परिवहन विभागाच्या मतानुसार ओव्हरलोड समजल्या जात असतांना कारवाई माञ होतांना दिसत नाही. यामुळेच रस्त्याला बाधा निर्माण होत असल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे.
नव्यानेच बांधण्यात आलेल्या रस्त्याच्या बांधकामाची गुणवत्ता नियंत्रण विभागकडून चौकशी करण्यात यावी, रस्त्याचे निकृष्ट बांधकाम करणारे कंत्राटदार, त्यावर नियंत्रण ठेवणारे संबधीत विभागाचे अभियंता, रस्ता बांधकामाचे देयक काढणारे अधिकारी यांचेवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनातुन करण्यात आली आहे. याप्रसंगी दीपक कोकास, सुधीर थेरे, किशोर किनाके, प्रशांत बालकी, अजय चन्ने, मोंटू अदवाणी, स्वप्नील ताजने यांची उपस्थिती होती.
Rokhthok News