Home Breaking News अठरा लाखाचे नुकसान, पावनेदोन लाखाची चोरी, दोघे ताब्यात

अठरा लाखाचे नुकसान, पावनेदोन लाखाची चोरी, दोघे ताब्यात

● गुन्‍हा नोंद होताच मुख्य आरोपी पसार

C1 20231013 12091783

गुन्‍हा नोंद होताच मुख्य आरोपी पसार

Wani News | स्‍थावर मालमत्‍तेचा वाद कोणत्‍या थराला जावू शकतो हे वणीकरांना बघायला मिळाले. चक्‍क जेसीबी मशिनच्‍या साह्याने मध्‍यवर्ती चौकातील फर्निचरचे दुकान जमीनदोस्‍त करण्‍यात आल्‍याची घटना गुरुवारी पहाटे घडली. यात तब्‍बल अठरा लाख रुपयांचे नुकसान तर एक लाख 70 हजार रुपयांची चोरी झाल्‍याची तक्रार पोलीसांत नोंद होताच आरोपी पसार झाला आहे. Eighteen lakh rupees loss and one lakh 70 thousand rupees stolen

समिर परवेज रफिक रंगरेज (40) असे गुन्‍हा नोंद झालेल्‍याचे मुख्‍य आरोपींचे नांव आहे. तो एकता नगर परिसरातील काझिपुरा परिसरातील निवासी आहे. टिळक चौक परिसरातील मालमत्‍तेचा वाद विकोपाला गेला आणि अंधाऱ्या राञी जेसीबी मशिनच्‍या साहयाने दुकानाची  प्रचंड नासधूस करण्‍यात आली.

पंकजकुमार बंसीलाल भंडारी (47) असे फिर्यादीचे नांव आहे त्‍यांचा फर्निचरचा व्‍यवसाय आहे. जिथे त्‍यांचे दुकान आहे याच मालमत्तेचा वाद असल्‍याचे बोलल्‍या जात आहे. माञ या जागेवर पंकज चा ताबा आहे आणि तो ताबा मिळावा याकरीता समिर याने उचललेले हे पाउल कायदयाच्‍या चौकटीत अडकले आहे.

Img 20250103 Wa0009

या घटनेत जेसीबी मशिनच्‍या साह्याने दुकानाचे शटर, कॉक्रिटचा छत, भिंती तोडण्‍यात आल्‍या. यावेळी दुकानातील तब्‍ब्‍ल अठरा लाख रुपयांच्‍या फर्निचर साहित्‍याची नासधूस झाली. तर 1 लाख 70 हजार रुपयांचा मौल्‍यवान ऐवज चोरीला गेला असे तक्रारीत नमुद केल्‍यावरुन पोलीसांनी विविध कलमान्‍वये गुन्‍हा नोंद केला आहे.

वणी पोलीसांनी तपासाची चक्रे हालवून घटनास्‍थळी वापरण्‍यात आलेले जेसीबी मशिन व दोन ऑपरेटर यांना ताब्‍यात घेतले आहे. या प्रकरणातील मुख्‍य आरोपी माञ पसार झाला आहे. मालमत्‍तेच्‍या वादातुन घडलेली घटना असुन याप्रकरणी पोलीसांनी विस्‍तृत कायदेशीर तपास करणे गरजेचे झाले आहे.
Rokhthok News