● MMPA कायद्यान्वये कारवाई
Wani News | इलोक्ट्रोपॅथीची पदवी बाळगुन अँलोपॅथीकची प्रॅक्टीस करणाऱ्या डॉक्टरवर तालुका आरोग्य अधिकारी यांचे पथकाने धाडसञ अवलंबले. या कारवाईमुळे वैद्यकीय क्षेञात चांगलीच खळबळ माजली असुन बोगस डॉक्टरांवर सुध्दा धडाकेबाज कारवाई अपेक्षीत असल्याचे बोलल्या जात आहे. Action against doctor practicing allopathy with electropathy degree

इलोक्ट्रोपॅथीची BEMS ही पदवी प्राप्त डॉ. तापस नारायण गाईन (34) असे कारवाई झालेल्या डॉक्टरांचे नांव आहे. ते नरेंद्रपुर ता. चार्मोशी जि. गडचिरोली येथील निवासी असुन सध्यस्थितीत मुकुटबन येथील ग्रामपंचायती जवळ दुकान थाटून ते बिनधास्तपणे अँलोपॅथीक औषध वापरुन लोकांच्या जिवाशी खेळ करत असल्याची गोपनिय माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन करनोजी गेडाम यांना मिळाली.
बुधवारी तालुका वैद्यकीय अधिकारी यांचे पथकाने मुकूटबन येथील ग्रामपंचायती जवळ असलेल्या डॉ. गाईन यांचे क्लिनिक ची तपासणी केली. यावेळी ते अवैद्यरित्या प्रॅक्टिस करीत असल्याचे आढळून आले. त्याचेकडे महाराष्ट्र वैद्यक व्यवसाय कायदा 1961 चे कलम 33 (1), 33(2) अंतर्गत अँलोपॅथी प्रॅक्टिस करण्याची परवानगी नसतांना सुध्दा अवैद्यरीत्या प्रॅक्टिस करीत असताना दिसले.
डॉ गाईन यांचेकडे BEMS भोपाळ नोंदणीकृत केलेली पदवी होती ती महाराष्ट्र मध्ये नोंदणी करणे अपेक्षित होते. त्या पदवी नुसारच त्यांना इलोक्ट्रोपॅथीकचे औषधोपचार करणे अपेक्षीत असतांना ते बिनधास्तपणे अँलोपॅथीक औषध वापरुन लोकांच्या जीवीतांशी खेळत असल्याचे स्पष्ट झाले. तसेच त्यांचे जवळ अँलोपॅथीकचा औषध साठा व इन्जेक्शन, सलाईन मिळून आले. ते सर्व साहित्य जप्त करण्यात आले आहे.
सदर कारवाई तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन करनोजी गेडाम, प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अतुल पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष गोपने, वैद्यकीय अधिकारी डॉ. जिवन कुळमेथे, PSI अनिल सकवान व मंगेश सलाम यांनी केली असुन डॉ. गाईन यांचे विरुध्द महाराष्ट्र वैद्यक व्यवसाय कायदा 1961 चे कलम 33(1), 33(2) नुसार कारवाई करण्यात आली.
Rokhthok News