● आत्महत्येचे सत्र थांबताथांबेना
Sad News Wani | तालुक्यात आत्महत्यांची शृंखला सुरू झाली की काय अशी शंका यायला लागली आहे. अवघ्या दोन दिवसात दोन आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत. गोपालपूर (खां.) येथील 62 वर्षीय वृद्धाने विषाचा घोट घेत आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना रविवार दिनांक 15 ऑक्टोबर ला रात्री 8:30 वाजता उघडकीस आली.Two suicide incidents have occurred in just two days.
सूर्यभान कृष्ण मोते (62) असे मृतक वृद्धांचे नाव आहे ते गोपालपूर (खां.) येथील निवासी होते. घटनेच्या दिवशी रात्री त्यांनी आपल्या राहत्या घरी विषारी द्रव्य प्राशन केले. ही बाब घरच्या मंडळींना कळताच त्यांना तात्काळ चंद्रपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
Rokhthok News





