● अखंड ज्योतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
Wani News | दुर्गा माता मंदिराचा जिर्णोध्दार पुर्ण झाला असून घटस्थापनेच्या दिवशी रेणुका मातेच्या अखंड ज्योतीने मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर भक्तांसाठी भव्य मंदिर खुले करण्यात आले आहे. दरम्यान अखंड ज्योतीचे दर्शन घेण्यासाठी दुर्गा माता मंदिरात भाविकांची गर्दी उसळली आहे. Devotees throng Durga Mata temple to have a glimpse of Akhand Jyoti.
नवशक्ती दुर्गा माता मंदिर येथील समितीने माहुरगड येथील महाराष्ट्रातील साडेतीन जागृत शक्तीपीठापैकी एक श्री रेणुका देवीची अखंड ज्योत प्रज्वलित करुन आणली. ही संकल्पना नवशक्ती दुर्गा माता मंदिराचे अध्यक्ष रवी बेलुरकर यांची होती.
घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर दिनांक 15 ऑक्टोबर ला सायंकाळी 5 वाजता वणी नगरीत अखंड ज्योत आणल्यावर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या जल्लोषत या ज्योत यात्रेचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर ती अखंड ज्योत दुर्गा माता मंदिरात प्रवेश करून मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर हि अखंड ज्योत भक्तांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आली आहे.
अखंड ज्योत आणण्यासाठी ज्योत यात्रेत समितीचे अध्यक्ष रवि बेलुरकर यांच्या सोबत समितीचे दौलत वाघमारे, प्रमोद लोणारे, चंदन मोहुले, नितीन बिहारी, राजकुमार अमरवानी, शिवा आसुटकर, पुरुषोत्तम मांदळे, अमोल बदखल, राजेंद्र जयस्वाल, स्वप्नील बिहारी, मारोती गोखरे या अखंड ज्योत यात्रेचे स्वागत करण्यासाठी दुर्गा माता मंदिर समितीचे सर्व सदस्य, वणीकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Rokhthok News