Home Breaking News Sad News | अनोळखी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

Sad News | अनोळखी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

● ओळख पटवण्याचा प्रयत्न

C1 20231019 20241104

ओळख पटवण्याचा प्रयत्न

Wani News | ती बसस्थानकात उभी होती, तिला कुठेतरी जायचे असेल. त्याच वेळी अचानक तिला उलट्या व्हायला लागल्या. कोणीतरी पोलिसांना सूचित केले. पोलिसांनी तात्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही दुःखद घटना गुरुवार दिनांक 19 ऑक्टोबर ला दुपारी दीड वाजता घडली. Unidentified woman died during treatment.

वणी बस स्थानकात अंदाजे 42 वर्षीय एक महिला दुपारी गावी जाण्यासाठी फलाट क्रमांक 6 जवळ बसची वाट बघत होती. अचानक ती उलट्या करायला लागली. आजूबाजूच्या प्रवाशांनी आस्थेने तिची विचारपूस केली मात्र ती बोलण्याचा मानसिकतेत नव्हती. पोलीस घटनास्थळी पोहचले त्यांनी तिला रुग्णालयात हलवले.

मृतक महिला लाल टिपक्याच्या रंगाची साडी व निळ्या रंगाचे ब्लाउज परिधान केलेली होती. तिच्या हातात तपकीरी रंगाची हॅन्ड बॅग होती मात्र तिची ओळख उलगडवावी असे कोणतेही दस्तऐवज त्यात नव्हते. तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून तिची ओळख पटवण्याचा प्रयत्न वणी पोलीस करताहेत.
Rokhtok News

Img 20250103 Wa0009