● त्या..अध्यादेशाचा भाजपाने नोंदवला निषेध
BJP Wani News | भारतीय जनता पक्षाने कंत्राटी नोकर भरतीचा (Contract Employees Recruitment) अध्यादेश रद्द केला आहे. तत्कालीन राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशाचा निषेध नोंदविण्याकरिता भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते शनिवार दिनांक 21 ऑक्टोबरला येथील शिवतीर्थावर जमले. याप्रसंगी महाविकास आघाडी सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा देत अध्यादेशाचा निषेध करण्यात आला. Bharatiya Janata Party has canceled the Contract Employees Recruitment Ordinance.
जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाच्या वतीने (BJP) वणीत तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने काढलेल्या कंत्राटी नोकर भरतीचा निषेध करण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटी नोकर भरतीचा अध्यादेश रद्द करून महाविकास आघाडी सरकारचा ‘पोरखेळ’ चव्हाट्यावर आणल्याचे बोर्डे यांनी स्पष्ट केले.
महाविकास आघाडी सरकारने काढलेल्या अध्यादेशामुळे तरुणांच्या स्वप्नाचा चुराडा झाला होता. महाविकास आघाडीचे नेते शरद पवार व उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी कंत्राटी भरतीचा निर्णय घेतला. त्याचा यावेळी निषेध करण्यात आला. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटी भरतीचा अध्यादेश रद्द केला यामुळे तरुणात उत्साह संचारला आहे.
जिल्हाध्यक्ष भाजपा तारेंद्रजी बोर्डे, किसान मोर्चा उपाध्यक्ष दिनकर पावडे, विजय पिदुरकर, किशोर बावणे, जिल्हा उपाध्यक्ष संजय पिंपळशेंडे, तालुकाध्यक्ष गजाननजी विद्याते, बंडू चांदेकर, अशोक सुर, मंजु डंभारे, जि .उपाध्यक्ष महीला संध्या अवताडे, नितीन वासेकर, राकेश बुग्गेवार, नेताजी मोरे, सत्यजित ठाकुरवार, संदीप बेसरकर, विठ्ठल कोडापे, अविनाश आवारी, शुभम इंगळे, मनोज केळकर, प्रदीप जेऊरकर, विलास निमकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
Rokhthok News