Home Breaking News Reliance : रिलायन्‍स मध्‍ये मनसेची कामगार सेना

Reliance : रिलायन्‍स मध्‍ये मनसेची कामगार सेना

● शेकडो कामगारांचा मनसेत प्रवेश ● सदस्याला 5 लाख रुपयांचे विमा कवच

C1 20231102 18330801

शेकडो कामगारांचा मनसेत प्रवेश
सदस्याला 5 लाख रुपयांचे विमा कवच

MNS NEWS WANI : झरी तालुक्या अंतर्गत येणाऱ्या मुकुटबन येथील रिलायन्स उद्योग समूहाच्या सिमेंट उत्पादन कंपनीत मनसेच्या कामगार सेनेची स्थापना करण्यात आली. मनसे नेते राजू उंबरकर यांच्या नेतृत्वात येथील शेकडो कामगारांनी पक्षात प्रवेश करत कामगार सेनेचे सदस्यत्व स्वीकारले. Under the leadership of MNS leader Raju Umbarkar, hundreds of workers here joined the party and accepted the membership of Kamgar Sena.

मुकुटबन येथे रिलायन्स उद्योग समूहाकडून स्थापन केलेली आरसीसीपीएल (RCCPL)कंपनी येथील बेरोजगार तरुणांसाठी वरदान ठरली आहे. परिसरातील युवकांना रोजगार मिळाला तर इतर उद्योगधंद्यांना चालना मिळाली आहे. कंपनीत काम करणाऱ्या शेकडो युवकांनी आपल्या न्याय हक्कासाठी मनसे कामगार सेनेची स्थापना करून कामगार एकजुटीचा घोषणा केली.

मुकुटबन शहरातील श्रीराम मंदिराच्या सभागृहात मनसे नेते राजु उंबरकर यांच्या उपस्थितीत कामगारांनी रितसर महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला आहे तर कामगारांच्‍या न्‍याय हक्‍कासाठी मनसे कामगार सेनेची स्‍थापना करण्‍यात आली आहे. सदस्‍यत्‍व स्विकारलेल्या सर्व सदस्यांना 5 लाख रूपयांचे आरोग्य व जीवन विमा कवच मनसेकडून मोफत देण्यात येईल अशी घोषणा ही यावेळी मनसे नेते उंबरकर यांनी केली.

Img 20250103 Wa0009

रिलायन्स उद्योग समूहाच्या आर.सी.सी.पी.एल या कंपनीत जास्तीत जास्त स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळावा यासाठी मनसे नेहमी आग्रही होती. पक्षाच्या माध्यमातून जास्तीत जास्त रोजगार या ठिकाणी स्थानिकांना देण्यात पक्षाला मोठ यश मिळालं आहे.

याप्रसंगी मनसेचे झरी तालुकाध्यक्ष गजानन मिलमिले,  वणी तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, शिवराज पेचे,  संतोष चिटलावार, वेणुगोपाल येणंपोतुलवार, अभिषेक पिटलावर,  लक्की सोमकुंवर, वैभव पुरानकर यांच्या सह शेकडो कामगार, पक्षाचे सदस्य उपस्थित होते.
Rokhthok News