● ग्रामीण भागातल्या मराठा समाजाची देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाला साथ
Political News | राज्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील भाजपने जोरदार मुसंडी मारत निकालांमध्ये आघाडी मिळवली आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 2359 ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालांना महत्त्व प्राप्त झालंय. Devendra Fadnavis-led BJP made a strong run in the Gram Panchayat elections.
विशेषतः भाजपने जिंकलेल्या ग्रामपंचायतींच्या विजयी उमेदवारांमध्ये मराठा समाजाचं प्राबल्य दिसून आलंय. त्यामुळे ग्रामीण भागातील मराठा समाजाने देवेंद्र फडणवीसांना साथ दिल्याचं स्पष्ट होतंय. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात फडणवीसांना काहींनी विरोध करूनही हे चित्र पुढे आल्याने भाजपच्या गोटात आनंदाचं वातावरण पसरलंय.
ग्रामपंचायत निवडणूक निकालांच्या सकाळी 12 वाजेपर्यंत आलेल्या निकालांनुसार विजयी घोषित झालेल्यांमध्ये भाजप 202, राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) 121, शिवसेना (शिंदे गट) 115, कॉंग्रेस 63, शिवसेना (ठाकरे गट) 56, राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट)65, आणि इतर 69 इतर ग्रामपंचायतींच्या निकालांमध्येही भाजपने आघाडी कायम राखली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या प्रचाराला ग्रामीण भागात साथ मिळाल्याचं दिसतंय.
Rokhthok News