● साखरा (दरा) येथील घटना
Wani News | मुकूटबन पोलीस स्टेशन हद्दीतील साखरा (दरा) येथील 40 वर्षीय इसमाने आपल्या शेतात जावून किटकनाशक प्राशन केले. ही घटना बुधवार दिनांक 8 नोव्हेबरला दुपारी उघडकीस आली. ऐन सन उत्सवाच्या काळात त्याने मृत्यूला कवटाळल्याने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 40-year-old man went to her farm and applied pesticides.
गणपत कवडू कुळसंगे (40) असे दुर्दैवी मृतकाचे नांव आहे ते साखरा (दरा) येथील निवासी होते. घटनेच्या दिवशी दुपारी ते आपल्या शेतात गेले. तेथेच त्यांनी विषारी औषध प्राशन केले. ही बाब परिसरातील अन्य शेतमजुरांना कळताच पोलीसांना व त्यांचे नातेवाईकांना कळविण्यात आले.
मुकूटबन पोलीसांनी घटनेची माहिती मिळताच साखरा (दरा) गाठत मृतदेहाचा पंचनामा केला आणि शव ग्रामीण रुग्णांलयात पाठविण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शव विच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांना सोपवला असुन पुढील तपास मुकूटबन पोलीस करताहेत. ऐन दिवाळी सनाच्या पुर्वीच गणपत ने हे टोकाचे पावूल उचलले असुन त्याने आत्मघाती निर्णय का घेतला हे स्पष्ट होवू शकले नाही.
Rokhthok News






