● आता मिळणार पक्षाला बळकटी
Rashtrawadi News Wani | येथील सामाजिक कार्यकर्ते रज्जाक खान हयात खान पठाण यांचेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महत्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे. प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रदेश संघटक सचिव या पदावर नुकतीच नियुक्ती केली आहे यामुळे आता पक्षाला बळकटी मिळणार आहे. Razzak Khan Hayat Khan Pathan was entrusted with important responsibility by the Nationalist Congress Party.
दोन तपापासुन समाजवादी पार्टीत विविध पदे भुषविणारे व प्रदेश कोषाध्यक्ष असलेले रज्जाक पठाण यांनी आपल्या पदांचा व सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा काही महिन्यांपूर्वी दिला होता. यामुळे त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांत संभ्रम निर्माण झाला होता. पठाण यांची पुढील रणनीती काय असेल याकडे लक्ष लागले होते.
रज्जाक पठाण यांनी दोन महिण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख यांची भेट यवतमाळ जिल्ह्याचे निरीक्षक तथा प्रदेश उपाध्यक्ष अफजल फारुक यांच्या माध्यमातून घेतली होती. याप्रसंगी आपले मत व्यक्त करताना पक्षाची संघटनात्मक बांधणी उत्तमरित्या करून पक्ष मजबूत करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे पठाण यांनी स्पष्ट केले होते.
रज्जाक पठाण हे गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. धडाकेबाज नेता म्हणुन त्यांनी ख्याती मिळवली आहे तर त्यांना मानणारा मोठा वर्ग तालुक्यात आहे. जिल्ह्यात शिवसेनेची मुहूर्तमेढ रोवल्यागेली तेव्हा पासुन त्यांनी शिवसेनेत कार्य केले आहे. शिवसैनिक म्हणुन त्यांनी आपला कार्यकाळ गाजवला आहे.
मुलायमसिंग यादव यांनी समाजवादी पार्टीला महाराष्ट्रात सक्रिय केले तेव्हा पासुन रज्जाक पठाण यांनी समाजवादी पार्टीत प्रवेश घेतला. पार्टीने त्यांच्यावर विविध पदांची जबाबदारी दिली होती, ते समाजवादी पार्टीचे प्रदेश कोषाध्यक्ष होते. त्यांनी समाजवादी पार्टीच्या वतीने चंद्रपुर – आर्णी लोकसभेचे उमेदवार म्हणुन निवडणुक लढवली होती.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश संघटक सचिव पदावर पठाण यांची नियुक्ती दिनांक 6 नोव्हेंबरला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. त्यांच्या निवडीमुळे कार्यकर्त्यांत चैतन्य निर्माण झाले आहे. आपल्या निवडीचे श्रेय त्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी गृहमंत्री, शब्बीर अहमद विद्रोही, प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा निरीक्षक अफजल फारूक, जिल्हाध्यक्षा वर्षा निकम व साहेबराव कदम पाटील यांना दिले.
Rokhthok News