Home Breaking News रेतीची चोरटी वाहतुक, तिघांवर गुन्‍हा

रेतीची चोरटी वाहतुक, तिघांवर गुन्‍हा

● अकरा लाखाचा मुददेमाल जप्‍त ● शिरपुर पोलीसांची कारवाई

1433
C1 20231119 13200426

अकरा लाखाचा मुददेमाल जप्‍त
शिरपुर पोलीसांची कारवाई

Wani News | पैनगंगा नदीपाञातुन अवैधरित्‍या गौण खनिजाची चोरी होत असल्‍याची गोपनिय माहिती ठाणेदार संजय राठोड यांना मिळाली. पोलीसांनी दोन पथके तयार करुन कूरई व गोवारी परिसरात पाळत ठेवली असता रेतीची चोरटी वाहतुक करणारे चोरटे गळाला लागले. हि कारवाई दिनांक 18 नोव्‍हेंबरला करण्‍यात आली. Thanedar Sanjay Rathod got confidential information about the theft of secondary minerals.

अरविंद मारुती बोबडे, मोहन निळकंठ बोबडे व भिवसन गणपत मंगाम रा. कूरई असे गुन्‍हा नोंद झालेल्‍यांची नांवे आहेत. पैनगंगा नदिपाञातुन अवैधरित्‍या रेतीची तस्‍करी करुन चढ्या दरात ते रेती विकत असायचे. वर्धा व पैनगंगा नदी रेती तस्‍करांचा मुख्‍य अड्डा झालेला आहे. बिनधास्त रेतीची चोरटी वाहतुक करण्‍यात येत आहे.

शिरपुर पोलीस ठाण्‍याचे ठाणेदार संजय राठोड यांना गोपनीय माहितगारांकडून रेतीची तस्‍करी होत असल्‍याचे कळले त्‍यांनी दोन पथके तयार केली आणि रेतीची चोरटी वाहतुक करणाऱ्यांच्या मुसक्‍या आवळल्‍या. तालुक्‍यात बिनधास्‍तपणे रेतीची चोरटी वाहतुक होत असतांना महसुल प्रशासन माञ मुग गिळून गप्‍प असल्‍याचे सकृतदर्शनी दिसत आहे.

शिरपुर पोलीसांनी दोन ट्रक्‍टर व रेती जप्‍त केली असुन महसुल प्रशासनाला सुचित करण्‍यात आले आहे. तर तिघांवर कलम 379, 109 भादवि सह कलम पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम 15 व महसूल अधिनियम कलम 48 प्रमाणे गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. पवन बन्‍सोड, अप्‍पर पोलीस अधिक्षक पियुष जगताप, SDPO गणेश किंद्रे यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार संजय राठोड, PSI रामेश्‍वर कांदुरे, प्रशांत झोड, गंगाधर घोडाम, विजय फुल्‍लूके व विनोद मोतीराव यांनी केली.
ROKHTHOK NEWS