● पोलिसात तक्रार दाखल
● 90 हजाराचे होते सोन्याचे दागिने
Crime News Wani | वणीत भावाच्या लग्नाला आलेल्या भावाला चांगलाच फटका बसला. साई ट्रॅव्हल्स मधून नागपूरला जात असताना डिक्कीतून त्यांची बॅग लंपास झाली. यात नव्वद हजार रुपयांचे दागिने व रोकड असल्याची तक्रार पोलिसात करण्यात आली आहे, ही घटना 4 डिसेंबर ला घडली. A complaint has been lodged with the police about the presence of jewelery and cash worth ninety thousand rupees.
मुंबईतील टिटवाळा परिसरात वास्तव्यास असलेला स्नेहल चंद्रभान सोनेकर (34) हा भावाच्या लग्नासाठी परिवारासह वणीत आला होता. जैन लेआऊट परिसरात राहणाऱ्या रवि चंद्रभान सोनेकर याचे लग्न होते. संपूर्ण लग्नसोहळा पार पडल्यानंतर तो मुंबईला जाण्यासाठी साई ट्रॅव्हल्स मध्ये 4 तारखेला पत्नीसह तो बसला.
येथील टिळक चौकातून साई ट्रॅव्हल्स क्रमांक MH-02- ER- 4603 मध्ये बसला. सोबत अनेक बॅग असल्याने त्यांनी काही बॅग ट्रॅव्हल्स च्या डिक्कीत ठेवल्या. त्यातील एका ब्यागेत सोन्याचे दागिने व रोकड ठेवली होती. आणि तीच बॅग लंपास झाल्याचे नागपूर ला पोहोचल्यावर त्यांच्या लक्षात आले.
नागपूर ला पोहचल्यानंतर त्यांनी ट्रॅव्हल्सच्या वाहकाला लंपास झालेल्या बॅग बाबत विचारणा केली. ट्रॅव्हल्सच्या मालकाला सुध्दा याप्रकरणी विचारले मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.
वणी पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत ब्यागेत एक तोळ्याची सोन्याची जुनी वापरती अंगठी किमत अंदाजे 40 हजार, दिड तोळे सोन्याचा गोफ 50 हजार, व रोकड पाच हजार असा एकूण 95 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करताहेत.
Rokhthok News






