Home Breaking News भरधाव पिकअप वाहनाने मजूर महिलांना उडवले

भरधाव पिकअप वाहनाने मजूर महिलांना उडवले

● महिला मजूर जखमी, पोलिसांत तक्रार

C1 20231211 22402300

महिला मजूर जखमी, पोलिसांत तक्रार

Wani News : महामार्गावर भरधाव वाहने हाकण्याची जणू स्पर्धाच लागली की काय अशी अनुभूती येत आहे. केळापूर तालुक्यातील मराठवाकडी येथील रोजमजुरी करणाऱ्या महिला मजूर आपल्या गावी परतत असताना भरधाव पिकअप वाहनाने त्यांना चक्क उडवले आणि वाहन पलटी झाले. या घटनेत काही महिला जखमी झाल्या आहेत. बेजबाबदारपणे वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांवर गुन्हा नोंदवावा अशी तक्रार पोलिसांत करण्यात आली आहे. A female laborer was on her way back to her village when a speeding pick-up vehicle ran over her.

मराठवाकडी येथील विलास पांडुरंग कनाके यांनी पोलिसात रीतसर तक्रार दाखल केली आहे. सोमवार दिनांक 11 डिसेंबरला सकाळी पत्नी गायत्री विलास कनाके हिच्यासह गावातील महिला कापूस वेचणीसाठी राकेश तिरमलवार यांचे शेतात गेल्या होत्या.

शेतातील काम आटोपून गायत्री कनाके, बेबी आडे, रेणुका तुळशिराम आडे, कार्तीका गंगाराम सोयाम, मनिषा गंगाराम आत्राम, करीष्मा महेश सोयाम पायदळ घरी परत येत असतांना पिकअप वाहन क्रमांक MH -33 -G -0188 याने सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान मराठवाकडी गावाजवळील पुलावर मजूर महिलांना जबर धडक दिली.

Img 20250103 Wa0009

या घटनेत महिला मजुरांना गंभीर दुखापत झाली असून अनेकांना मुकामार लागला आहे. महिला जखमी झाल्या आहेत. या प्रकरणी पिकअप वाहन चालकांवर बेजबाबदारपणे वाहन चालवल्यामुळे गुन्हा नोंद करावा अशी मागणी करण्यात आली आहे. पोलीस नेमकी काय कारवाई करणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
Rokhthok News

Previous articlepoison : तरुणांचा उपचारादरम्यान मृत्यू
Next articleनिर्दयपणे जनावरांची तस्करी, एक अटकेत
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.