Home Breaking News Raid by LCB : 46 हजाराचा देशी दारु साठा जप्‍त

Raid by LCB : 46 हजाराचा देशी दारु साठा जप्‍त

● दारू पुरवठा करणारा अनुज्ञप्‍ती धारक कोण

1101
C1 20231214 17041342

दारू पुरवठा करणारा अनुज्ञप्‍ती धारक कोण

WANI NEWS : (LCB) स्‍थानिक गुन्‍हे शाखा पथकाने मारेगांव तालुक्‍यातील सराटी येथे धाडसञ अवलंबत तब्‍बल 46 हजार 704 रुपयांचा देशी दारु साठा जप्‍त केला. अवैध दारु बाळगणाऱ्याला ताब्‍यात घेतले असुन दारुसाठा पुरवठा करणाऱ्या अनुज्ञप्‍ती धारकांवर सुध्‍दा गुन्‍हा नोंदवणे गरजेचे आहे. ही कारवाई बुधवारी मध्‍यराञी करण्‍यात आली. The local crime branch team seized country liquor stock worth Rs 46 thousand 704 in a raid at Sarati in Maregaon taluka.

Img 20250422 wa0027

ग्रामीण भागात मोठया प्रमाणात देशी दारुचा पुरवठा करण्‍यात येतो. अनेक बेरोजगार तरुण या अवैध धंद्यात लिप्‍त आहेत, दारुसाठा नेमका कोणत्‍या अनुज्ञप्‍ती धारकांकडून पुरवण्‍यात आला हे उत्‍पादन शुल्‍क विभागाच्‍या अधिकाऱ्यांनी शोधुन काढणे गरजेचे आहे. वणी उपविभागात खुलेआम ग्रामीण भागात देशी दारुचा पुरवठा होत असल्‍याचे वास्‍तव नाकारता येत नाही.

Img 20250103 Wa0009

पोलीस अधिक्षकांनी जिल्हात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे सुरु राहणार नाहीत व अवैध धंदयांचे समूळ उच्चाटन व्हावे असे अधिनस्‍त अधिकाऱ्यांना आदेशीत केले आहे. यामुळे स्थानिक गुन्हे शाखा पथक सतर्क झाले असुन गोपनिय माहितीच्‍या आधारे अवैध धंद्यावर सातत्‍याने कारवाई करताहेत.

स्‍थानिक गुन्‍हे शाखेच्‍या पथकाला प्राप्‍त माहितीच्‍या आधारे मारेगांव पोलीस ठाण्‍याच्‍या हददीत येत असलेल्‍या सराटी या गावात मध्‍यराञी धाडसञ अवलंबले. यावेळी विवेक नरहरी नरांजे (39) याचे घराची झडती घेतली असता एका खोलीत देशी दारुच्या “रुपेश संत्रा” असे लेबल असलेले एकुण 14 बॉक्स मध्ये 180 एमएल क्षमतेच्या देशी दारुच्या एकुण 672 बॉटल आढळुन आल्‍या. आरोपी विरुध्द मारेगांव पोलीस ठाण्‍यात महाराष्ट्र दारुबंदी कायदयान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, LCB PI आधासिंग सोनोने यांचे मार्गदर्शनात API अतुल मोहनकर, सुनिल खंडागळे,  सुधीर पांडे, सुधीर पिदुरकर, रजनिकांत मडावी, सतिश फुके व मारेगांव चे रजनिकांत पाटील, राजु टेकाम यांनी केली.
Rokhthok News