● आमलोन येथील घटना
Sad News Wani : झरी जामनी तालुक्यातील आमलोन येथे वास्तव्यास असलेल्या 50 वर्षीय व्यक्तीने आपल्या राहत्या घरातच गळफास लावून आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना दिनांक 19 डिसेंबरला उघडकीस आली. A 50-year-old man committed suicide by hanging himself in his residence.
आनंदराव शंकर मेश्राम (50) असे मृतकांचे नांव आहे. ते आमलोन येथील निवासी होते. त्यांनी आपल्या राहत्या घरातच गळफास लावला. ही बाब नातेवाईकांना कळताच त्यांनी मुकूटबन पोलीसांना सुचित केले.
पोलीसांनी मृतदेहांचा पंचनामा केला आणि शव उत्तरीय तपासणी करीता वणी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. त्यांनी आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप स्पष्ट होवू शकले नाही. पुढील तपास मुकूटबन पोलीस करीत आहे.
Rokhthok News






